Sunday, May 26, 2024
Homeजळगावपाचोरा ; व्यापारी संकुल गाळे लिलावात घोटाळा?

पाचोरा ; व्यापारी संकुल गाळे लिलावात घोटाळा?

पाचोरा – प्रतिनिधी pachora

शहराच्या मध्यवर्ती असलेल्या नगरपालिका (Municipality) जीन परिसरातील माजी मंत्री के एम बापू पाटील यांच्या नावाने बांधण्यात आलेल्या शॉपिंग सेंटरच्या (shopping center) गाळे लिलावात मोठ्या प्रमाणावर अनागोंदी आणि लिलाव प्रक्रिया झाल्या नंतर ही पुन्हा इ-लिलाव प्रक्रिया राबवून मोठा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले असून या इ लिलाव प्रक्रियेतून आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप काही व्यापाऱ्यांच्या वतीने करण्यात आल्याची चर्चा आहे? तर या विरोधात या संकुलतील काही गाळेधारक व्यापाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.

- Advertisement -

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी के एम बापू पाटील शॉपिंग कॉम्प्लेक्स ची भव्य दुमजली इमारत बांधण्यात आली असून तळमजल्यात भाजीपाला मंडी व्यतिरिक्त पहिल्या माळ्यावर ५८ तर वरच्या मजल्यावर ९४ व्यापारी गाळे काढण्यात आले आहे. विशेष म्हणजे स्थानिक सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी शासनाच्या विशेष घटक योजनेमधून शासकीय अनुदानात या व्यापारी संकुलाचे बांधकाम झालेले आहे.येथील गाळे देताना स्थानिक बेरोजगारांना आणि गोरगरीब युवकाना प्राधान्य देवून एकास एकच गाळा देण्याचे प्रावधान असताना एका कुटुंबातील सदस्यांच्या व निकटवर्ती यांच्या नावाने नऊ ते दहा गाळे देण्याचा प्रकार देखील प्राप्त माहितीवरून समोर आला आहे. तसेच या लिलाव प्रक्रियेत स्थानिकांना डावलून परराज्यातील व्यापाऱ्यांना यातील काही गाळे देण्यात आल्याचे उघड होत आहे.

कें एम बापू शॉपिंग कॉम्प्लेक्स चे बांधकाम पूर्णत्वास येत असताना ४ नोव्हेंबर २०२० रोजी मोठा गाजावाजा करून गाळे लिलाव करण्यातआले होते. लिलावात सहभागासाठी एक लाख रुपये अनामत देऊन झालेल्या लिलावात काही गाळ्याना २४ ते २८ लाख रुपये पर्यंतची बोली लावण्यात आली होती. दरम्यान लिलाव प्रक्रियेत नगरपालिका प्रशासनाने संबंधित लिलावधारकांकडून उर्वरित रकमेची मागणी करताना तीन वर्षांचा करार व डिपॉझिट रक्कम ना परतावा असल्याचा उल्लेख असलेल्या नोटीस पाठवल्या. मुळातच लिलावाची बोलीच्या रकमा स्वरूपाच्या असताना एवढी मोठी रक्कम तीन वर्षांसाठी ना परतावा रक्कम म्हणून कशी भरणार! तसेच भाडे कराराविषयी ची भूमिका काय असेल याबाबतची विचारणा नगरपालिकेकडे केल्यानंतर योग्य तो खुलासा नगरपालिकेकडून करण्यात आला नाही .दरम्यान यातील ३२ गाळेधारकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाकडे दाद मागितलेली आहे.

या कालावधीत नगरपालिकेने फेर लिलाव प्रक्रिया राबवून आधीच्या किमतीपेक्षा निम्म्या दराने गाळ्याचे लिलाव उरकून घेतले. हे लिलाव संशयास्पद रीतीने झाले असून न्यायालयात गेलेल्या व्यापाऱ्यांना डावलून नियमबाह्य व छुप्या पद्धतीने फेर लीलाव प्रक्रिया केली असल्याचे व्यापारी बांधवांकडून पालिका प्रशासनावर आर्थिक घोटाळा केल्याचे आरोप केले जात असल्याचे समजते.? या संपूर्ण व्यवहारात फेरलीलावत दाखवण्यात आलेले उपस्थित नागरिक एकाच कुटुंबातील व त्यांचे निकटवर्तीय असल्याचे समाविष्ट नावावरून उघड झाले आहे.

यात मोठ्या रकमेचे गैरव्यवहार झाल्याचे देखील उघडपणे बोलले जात आहे. नगरपालिकेची संबंधित एका मद्यस्थ मार्फत मोठी रक्कम जमा केल्याचे बोलले जात असून हा मध्यस्थी कोण ? असा प्रश्न देखील जनसामान्यात विचारला जात आहे .एकंदरीतच पाचोरा तालुक्यातील व्यापारी व अर्थकारणात अशा प्रकारांमुळे जनमाणसात संतप्त भावना आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या