Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं गौरव

ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कारानं गौरव

मुंबई | Mumbai

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना यंदाच्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला.

- Advertisement -

नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा दिमाखात पार पडला. या पुरस्कार सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक नेतेमंडळींनी हजेरी लावली होती. यासोबतच हा अभूतपूर्व सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी लाखो अनुयायांनी उपस्थिती लावली होती.

श्रीरामाची प्रतिमा देऊन डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्रभूषण’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांनी शाल मानपत्र, २५ लाख रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह देत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

बैठक चळवळीचे प्रणेते दिवंगत महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी यांनी दासबोधाच्या निरूपणातून समाजमनात आमूलाग्र बदल केले आहेत. समाजातील अंधव्यवस्थेवर दासबोधी विचारांच्या माध्यमातून जनजागृती करत समाजाला सकारात्मक वाटेवर घेऊन जाण्याचे काम या चळवळीतून झाले आहे.

नानासाहेब धर्माधिकारी यांची समाजपरिवर्तनाची ही धुरा त्यांचे सुपुत्र आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी कायम ठेवली आहे. त्यामुळे खारघरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्रभूषण पुरस्कारासाठी आठवड्याभरापासून श्री सदस्यांकडून श्रमदान केले जात आहे. यामागे प्रत्येक काम हे देशासाठी, स्वधर्मासाठी करत असल्याची भावना श्री सदस्यांमधून व्यक्त केली जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या