नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातून आप आपल्या राज्यात परतण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत असून विमान तिकीट आणि रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी एकच झुंबड उडाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, देशावरील दहशवादी हल्ल्याच्या संकटात काही विमान कंपन्यांनी स्वत:ची संधी शोधत विमान तिकीटाचे दर तीन पटीने वाढवले आहेत.
यासंदर्भात सोशल मीडियावर काही युजर्संकडून सध्याच्या विमान तिकीटाचे दर शेअर करण्यात आले आहेत. श्रीनगरहून मुंबई आणि दुसरीकडे प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी तिकीटदर वाढविण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. विमान कंपन्यांनी तिकीट रद्दचे चार्ज आणि rescheduling चार्ज न लावण्याचे आदेश DGCA ने दिले आहेत. तसेच, विमान कंपन्यांनी तिकीट दर न वाढविण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
Aftermath of Pahalgam terror attack, DGCA issues advisory to airlines over surge in pricing and waiving cancellation charges: DGCA pic.twitter.com/GHzerH1NSw
— ANI (@ANI) April 23, 2025
डीजीसीएने आज सकाळी हे आदेश जारी केले आहेत. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील पर्यटक आपल्या गावी परतत आहेत. त्यामुळे श्रीनगरहून देशभरात विमानांचे उड्डाण वाढविण्यात यावेत, असे निर्देश देण्यात आलेत. शेकडो पर्यटक आणि भाविक अमरनाथ यात्रा, वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी काश्मीरला आलेत. पण दहशतवादी हल्ला झाल्याने ते आपल्या घरी परतत आहेत. त्यामुळे स्वस्त तिकीट दर आणि विमानांची संख्या वाढविण्याचे आदेश डीजीसीएकडून विमान कंपन्यांना दिलेत.
Just look at how Private Airlines are charging 3 times more fare from the panick stricken tourists of Sri Nagar. pic.twitter.com/uFyc3TTgr5
— Manish RJ (@mrjethwani_) April 23, 2025
श्रीनगर ते मुंबई तिकीट दर ५६ हजार रुपयांपर्यंत
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर श्रीनगरहून मुंबई जाण्यासाठी असणाऱ्या तिकीटांचे दर वाढविण्यात आल्याचे काही युजर्संने सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यानुसार, तब्बल तीन पट जास्त दराने हा प्रवास करावा लागत असून श्रीनगर ते मुंबई विमानाचे तिकीट ५६ हजार रुपयांपर्यत वाढवल्याचे एका युजर्संने स्क्रीन शॉट शेअर करुन म्हटले. त्यामुळे, नेटीझन्सने विमानकंपन्यांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला असून संकटात संधी शोधण्याचे काम दुर्दैवी आणि संतापजनक असल्याचेही नेटीझन्सने म्हटले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा