मुंबई | Mumbai
जम्मू आणि काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये दोन दिवसांपूर्वी दहशतवादी हल्ला झाला होता. या दहशतवादी हल्ल्यात देशातील २५ आणि नेपाळमधील एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. यात महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातून (Maharashtra) जम्मू आणि काश्मीरला पर्यटनासाठी गेलेले शेकडो नागरिक अडकले आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे.
यानंतर महाराष्ट्र सरकारने या पर्यटकांना परत आणण्यासाठी आणखी एका विशेष विमानाची (Flight) व्यवस्था केली आहे. या विशेष विमानातून १०० पर्यटकांना राज्यात परत आणले जाणार आहे.नुकतीच या १०० पर्यटकांची यादी जाहीर करण्यात आली असून, यासंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाच्या एक्स अकाउंटवरून माहिती देण्यात आली आहे. तसेच काल देखील राज्य सरकारने जम्मू आणि काश्मीरमधून परत आणल्या जाणाऱ्या ८३ पर्यटकांची यादी जाहीर केली होती.
काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था झाली आहे. एअर इंडियाचे हे विमान महाराष्ट्रातील 100 पर्यटकांना घेऊन आज मुंबईला येईल. या विमानातील प्रवाशांची यादी सोबत जोडली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर आज 2 विशेष… pic.twitter.com/WqRdPkWs2L— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 24, 2025
एअर इंडियाचे विमान १०० पर्यटकांना महाराष्ट्रात आणणार
मुख्यमंत्री कार्यालयाने पोस्टमध्ये (CMO Office) म्हटले की, “काश्मिरातील महाराष्ट्राच्या नागरिकांना परत आणण्यासाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था झाली आहे. एअर इंडियाचे हे विमान महाराष्ट्रातील १०० पर्यटकांना घेऊन आज मुंबईला येईल. या विमानातील प्रवाशांची यादी सोबत जोडली आहे.
दोन्ही विमाने सायंकाळच्या सुमारास मुंबईत येणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश दिल्यानंतर आज दोन विशेष विमाने मुंबईत येणार आहेत. इंडिगोचे विमान ८३ पर्यटकांना परत आणेल, तर एअर इंडियाच्या विमानाने १००, असे महाराष्ट्रातील एकूण १८३ पर्यटक आज मुंबईत परततील. ही दोन्ही विमाने सायंकाळच्या सुमारास मुंबईत येणार आहेत. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे यासाठी संपूर्ण मदत करीत आहेत. या विशेष विमानांचा खर्च राज्य सरकार करणार आहे.