नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये शहीद झालेल्या भारतीय नौदलाचे अधिकारी विनय नरवाल यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. यावेळी नवविवाहित पत्नी हिमानीने दिल्ली एअरपोर्टवर पतीचे पार्थिव पाहून हंबरडा फोडला. यावेळी ती एकच प्रश्न विचारत होती की,’मी आता कशी जगू?’
पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात आत्तापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहे. हा हल्ला हा २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतरचा दुसरा सर्वांत मोठा हल्ला आहे. साधारणपणे चार दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. दहशतवाद्यांनी धर्म विचारत पर्यटकांच्या दिशेने चार ते पाच मिनिटे गोळीबार केला.
या हल्ल्यात नौदलाचे अधिकारी असलेल्या विनय नरवाल याचाही मृत्यू झाला आहे. २६ वर्षीय विनयचा ७ दिवसांपूर्वी म्हणजेच १६ एप्रिल रोजी हिमांशीशी विवाह झाले होते. हनीमूनसाठी ते पहलगामला गेले होते. मात्र पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात त्यांना जीव गमवावा लागला आहे. दहशतवाद्यांनी हिमाशींसमोर विनयवर गोळ्या झाडल्या. यानंतर पत्नीने आता विनयला अखेरचा निरोप दिला आहे.
#WATCH | Delhi | Indian Navy Lieutenant Vinay Narwal's wife bids an emotional farewell to her husband, who was killed in the Pahalgam terror attack
The couple got married on April 16. pic.twitter.com/KJpLEeyxfJ
— ANI (@ANI) April 23, 2025
विनय नरवालच्या पत्नीने शवपेटीला मिठी मारली. यावेळी तिला रडू आवरले नाही, तिने हंबरडा फोडला. शेवटी सॅल्यूट करून तिने जयहिंद असे म्हटले. लेफ्टनंट नरवाल यांचे पार्थिव इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचताच कुटुंबातील सदस्य, लष्करी अधिकारी आणि तेथे उपस्थित असलेले सामान्य लोक दुःखी झाले. नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आणि अभिवादन केले. त्यांच्यासोबत हवाई दल प्रमुख आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनीही शहीदांना श्रद्धांजली वाहिली.
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी व्हिडीओ कॉलवर विनयचे आजोबा हवा सिंह नरवाल यांच्याशी बोलून त्यांचे सांत्वन केले. विनय त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. विनयच्या आजोबांनी पत्रकारांना सांगितले की, “लग्नानंतर त्याला स्वित्झर्लंडला जायचे होते पण त्याला व्हिसा मिळाला नाही आणि म्हणूनच तो काश्मीरला गेला.”
आजोबांनी पंतप्रधान मोदींना दहशतवाद संपवण्याचे आवाहन केले. मूळचा हरियाणाच्या कर्नाल जिल्ह्यातील रहिवासी असलेला विनय नरवाल २ वर्षांपूर्वीच नेव्हीमध्ये रुजू झाला होता. विनयला दहशतवाद्यांनी गोळ्या घालून ठार केले. विनयची पत्नी सुरक्षित आहे. या घटनेनंतर विनयच्या मृतदेहाजवळ बसलेल्या त्याच्या पत्नीचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा