नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (29 एप्रिल) लष्कराच्या तीनही दलांच्या प्रमुखांसह तसेच निमलष्करी दलांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीत नरेंद्र मोदींनी लष्करावर पूर्ण विश्वास व्यक्त करत फ्री हँड दिला. तसेच लष्कराच्या तीनही दलांनी कारवाई केल्यास राजकीय नेतृत्व संपूर्ण पाठिशी असल्याचे स्पष्ट केले.
या आधीचा पूर्वानुभव लक्षात घेता भारत आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता असल्याने पाकिस्तान भीतीच्या सावटाखाली आहे. त्याला भारताकडून लष्करी हल्ल्याची भीती आहे. म्हणूनच मंगळवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास पाकिस्तानचे माहितीमंत्री अतातुल्लाह तरार यांनी आपत्कालीन पत्रकार परिषदे घेत भारत २४ ते ३६ तासांत पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई करणार असल्याची विश्वसनीय माहिती गुप्तचर विभागाकडून पाकिस्तानला मिळाली असल्याचा दावा अतातुल्लाह तरार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
भारत पहलगाम हल्ल्याच्या बहाण्याने पुढील २४ ते ३६ तासांत पाकिस्तानवर भारतीय सैन्य हल्ला करू शकते. आम्ही कुठल्याही हल्ल्याला निर्णायक प्रत्युत्तर देऊ…, असे मंत्री अतातुल्लाह म्हणाला. तथपि, अशा सहभागीचे आरोप पाकिस्तान स्पष्टपणे नाकारत असून कोणत्याही प्रकारच्या आक्रमणाला निर्णायक प्रत्युत्तर देण्यात येईल, असे त्याने म्हटले आहे. खुद्द पाकिस्तान दहशतवादाचे लक्ष्य असल्याचे सांगत भारत आता स्वत:ला “जज, ज्युरी आणि जल्लाद” समजत असून ही एक धोकादायक आणि बेजबाबदार वृत्ती आहे, असे तरार यांनी म्हटले आहे.
Pakistan has credible intelligence that India intends carrying out military action against Pakistan in the next 24-36 hours on the pretext of baseless and concocted allegations of involvement in the Pahalgam incident.
Indian self assumed hubristic role of Judge, Jury and… pic.twitter.com/WVW6yhxTJ0— Attaullah Tarar (@TararAttaullah) April 29, 2025
पहलगाम हल्ल्याची स्वतंत्र, निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्यासाठी न्यूट्रल एक्स्पर्ट कमिशन नेमण्याचा प्रस्ताव पाकिस्तानने ठेवला होता, पण भारताने तो स्वीकारला नाही. तपास टाळण्यावरून भारताचा हेतू शुद्ध नसल्याचे सिद्ध होते, असा दावा करून, केवळ राजकीय फायद्यासाठी जनतेच्या भावना भडकवून लष्करी निर्णय घेतले जात आहेत, असा आऱोप त्याने केला. पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे कोणत्याही किंमतीत संरक्षण करण्याच्या संकल्पाचा मी इथे पुनरुच्चार करतो. तसेच कोणत्याही आक्रमक कारवाईला निर्णायक प्रत्युत्तर दिले जाईल”, असे पाकिस्तानचे माहिती मंत्री यांनी म्हटले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा