Friday, April 25, 2025
Homeदेश विदेशPahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाकडून मोठी कारवाई! लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरचा...

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाकडून मोठी कारवाई! लष्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरचा केला खात्मा

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दलाने मोठी कारवाई केली. जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात आज शुक्रवारी झालेल्या चकमकीत भारतीय सुरक्षा जवानांनी लष्कर-ए-तोयबा (एलईटी) चा टॉप कमांडर अल्ताफ लल्ली याला ठार केले. विशेष म्हणजे पहलगाम हल्ल्याची जबाबदारी लश्कर ए तोयबाच्या रेजिस्टेंस फोर्सनं घेतली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात आज दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक उडाली. बांदीपोरा जिल्ह्यातील कुलनार बाजीपुरा भागात दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर सुरक्षा दलांच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत परिसराला घेराव घातला आणि सर्च ऑपरेशन सुरू केले. लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार केला. त्यानंतर चकमक सुरू झाली असून दोन जवान जखमी झाले आहे. तर या चकमकीत एलईटी चा टॉप कमांडर अल्ताफ लल्ली ठार झाला आहे.

- Advertisement -

ही चकमक सकाळपासून सुरू होती. लपून बसलेले दहशतवादी जवानांवर गोळीबार करत होते. या दहशतवाद्यांनात जवान देखील चोख प्रत्युत्तर देत होते. या चकमकीमध्ये लष्कर-ए-तोएबाचा कमांडर अल्ताफ लल्ली याला ठार करण्यात जवानांना यश आले आहे. या परिसरात अजूनही चकमक सुरू आहे. जवानांकडून चोख पद्धतीने सर्च ऑपरेन सुरू आहे.

दरम्यान, लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज श्रीनगरमध्ये दाखल झाले. त्यांना बांदीपोरा येथे सुरू असलेल्या सर्च ऑपरेशनची माहिती देण्यात आली. ते येथील सुरक्षा स्थितीचा आढावा घेत आहेत.

पहलगामधील दहशतवादी हल्ल्यानंतर सध्या सीमेवर तणावाची स्थिती आहे. यासोबतच भारत आणि पाकिस्तान देशादरम्यान तणावाचे वातावरण आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तीन दिवसांनंतर पाकिस्तानी सैन्याने रात्रभर नियंत्रण रेषेवरील अनेक पाकिस्तानी चौक्यांवरून गोळीबार केला. पण या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. या घटनेत भारताच्या बाजूने कोणीही जखमी अथवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

दरम्यान, २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांकडून शोध मोहीम राबवली जात आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांच्या सहकार्याने संयुक्त शोध मोहीम राबवली जात आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...