दिल्ली | वृत्तसंस्था
पहलगाम हल्ल्यानंतर कॅबिनेट सुरक्षा समिती कडून बैठक आयोजित करण्यात आली होती. यात पहलगाम हल्ल्या बाबत सर्व माहीत देण्यात आली. कॅबिनेट सुरक्षा समिती कडून हल्ल्याचा निषेध करण्यात आला आहे.दरम्यान भारत सरकारने पाकिस्तान विरोधात कठोर पाउले उचलली आहेत.
- Advertisement -
कारवाई पुढील प्रमाणे
१) पाकिस्तान सोबतचा सिंधू पाणी करार थांबवला
2) अटारी-वाघा बॉर्डर बंद करणार
३) पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा बंद करणार; पुढील ४८ तासात पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडण्याचे आदेश
४)पाकिस्तानी नागरिकांना भारतात बंदी
५)आठ दिवसात पाकिस्तानी राजकीय अधिकाऱ्यांनी भारत सोडावा
६) जे भारतीय नागरिक पाकिस्तानात आहेत त्यांनी 1 मे पर्यंत भारतात परत यावे