नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
भारतीय सैन्याने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानमध्ये (Pakistan) सध्या भीतीचे वातावरण आहे. भारताने (India) पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील ९ दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केले. भारताच्या या एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तान चांगलाच हादरला आहे. या धक्क्यातून बाहेर येत नाही तोवरच पाकिस्तानला आणखी मोठे धक्के बसले आहेत.
पाकिस्तानच्या १२ शहरांमध्ये साखळी बॉम्बस्फोट (Serial Bomb Blasts) झाले आहेत. पाकिस्तानातील लाहोर, कराची, सियालकोट, गुजरावाला, शेखपुरा, नरवाल, कसूर, बहावलनगर, रावळपिंडी या शहरांत बॉम्ब झाले आहेत. तर ५० ठिकाणी ड्रोन हल्ले करण्यात आले असून, या ड्रोन हल्ल्यांमुळे इमर्जन्सी सारखी स्थिती निर्माण झाली आहे. तसेच हे ड्रोन कुठून आले? याबद्दल पाकिस्तानने अजून काहीही सांगितलेले नाही.
याशिवाय कोणीही या ड्रोन हल्ल्यांची (Drone Attack) जबाबदारी अजून स्वीकारलेली नाही. तसेच या पाच शहरांसोबतच उमरकोटमध्ये सुद्धा ड्रोन हल्ला करण्यात आला आहे. तर सर्वात जास्त तीन ड्रोन स्फोट लाहोरमध्ये झाले आहेत. पाकिस्तानी मीडियानुसार आतापर्यंत पाकिस्तानात एकूण १२ बॉम्बस्फोट झाले असून, लाहोरच्या सैन्य ठिकाणांजवळ हे ड्रोन हल्ले झाल्याचे समजते.
दरम्यान, पाकिस्तानमधील या स्फोटांच्या मालिकेमुळे पाकिस्तानात घबराट पसरली आहे. तसेच या स्फोटानंतर संपूर्ण परिसर बंद करण्यात आला आहे. पाकिस्तानी मीडियानुसार, कराचीमध्ये ड्रोन ब्लास्ट झाले असून, ड्रोन ब्लास्टनंतर संपूर्ण भागात भीती पसरली आहे. तसेच या स्फोटानंतर सैन्याने संपूर्ण भाग आपल्या ताब्यात घेतला आहे. तर कराचीमधील पाकिस्तानच अणवस्त्र बॉम्ब स्टोर असून, या ड्रोन स्फोटामुळे पाकिस्तानच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.