राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता तालुक्यातील वाकडी गावातील मुस्लिम कब्रस्थानमधील एका उंच लिंबाच्या झाडाला पाक सदृश असलेला झेंडा आढळून आल्याने गावात तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती श्रीरामपूर तालुका पोलीस व गुप्तचर यंत्रणेला समजताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. झेंडा असलेल्या ठिकाणी पोलिसांनी धाव घेऊन तेथील तरुणांना झेंडा खाली काढण्यास सांगितला. झेंडा खाली काढल्यावर पोलिसांनी ताब्यात घेतला. तो झेंडा पोलिस घेऊन जात असताना वाकडी येथील संतप्त ग्रामस्थ व तरुणांनी पोलिसांची गाडी अडवून हा झेंडा गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाळून भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद च्या घोषणा दिल्या. यानंतर सर्वांनी घडलेल्या घटनेचा तीव्र संताप व्यक्त करत निषेध सभा घेण्यात आली.
यावेळी विठ्ठलराव शेळके, रामभाऊ शेळके, बापूसाहेब लहारे, अनिल शेळके, महेश लहारे, महेश जाधव, बाळासाहेब आहेर आदींनी संतप्त भावना व्यक्त केल्या. जम्मू काश्मीर मधील पहलगाममध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंना मारले. त्या निर्दयी व नीच घटनेचा पुन्हा निषेध करून सदरील झेंडा वाकडी सारख्या गावात आढळून आल्याने ग्रामस्थ आता चांगलेच आक्रमक झाले आहे. वाकडी गावात हा झेंडा आला कुठून, हा झेंडा इथं लावला कोणी या सर्वांचा शोध घेऊन त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याञ्या मागणीचे निवेदन पोलिसांना देऊन कारवाई न झाल्यास आंदोलनचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.