Sunday, October 13, 2024
Homeमुख्य बातम्याIND vs PAK : भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे पाकिस्तान ढेपाळला; १९१ वर ऑलआऊट

IND vs PAK : भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे पाकिस्तान ढेपाळला; १९१ वर ऑलआऊट

अहमदाबाद | Ahmedabad

आज एकदिवसीय विश्वचषकाच्या (ODI World Cup) १२ व्या सामन्यात भारताचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) पाकिस्तानशी होत आहे. भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) हे दोन्ही संघ सलग तिसऱ्यांदा विजय मिळवण्यासाठी एकमेकांशी दोन हात करत आहेत. विश्वचषकाच्या इतिहासातील दोन्ही संघांमधील हा आठवा सामना असून भारताचा रेकॉर्ड ७-० असा आहे. त्यानंतर आजचा सामना कोण जिंकणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत…

- Advertisement -

Chhagan Bhujbal : “मला मोठं केलं ते…”; छगन भुजबळांचे जरांगे पाटलांना प्रत्युत्तर

आजच्या सामन्यात भारताने (India) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर पाकिस्तानच्या डावाची सुरुवात इमाम उल हक आणि अब्दुल्ला शफिक यांनी केली. यानंतर मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) आठव्या षटकात ४१ धावांवर शफिकच्या रूपाने पाकिस्तानला पहिला झटका दिला. रफिक २४ चेंडूत २० धावा करून बाद झाला. त्यानंतर हार्दिक पांड्याने १३ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर पाकिस्तानचा सलामीवीर इमाम हकला बाद केले. इमामने ३८ चेंडूत ३६ धावा केल्या.

Cabinet Expansion : राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार? शिंदे-फडणवीसांमध्ये तब्बल अडीच तास खलबतं

दोन्ही सलामीवीर माघारी परतल्यानंतर पाकिस्तानचा डाव कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि मोहम्मद रिझवान यांनी तिसऱ्या विकेटसाठी चांगली भागीदारी रचत २० षटकात पाकिस्तानची धावसंख्या १०० च्या पार करून दिली. यानंतर बाबर आझम आणि रिझवान यांनी ८२ धावांची भागीदारी करत पाकिस्तानचा (Pakistan) डाव सावरला. मात्र, मोहम्मद सिराजने ५० धावांवर बाबरला त्रिफळाचीत करत पाकिस्तानला तिसरा धक्का दिला. त्यानंतर कुलदीप यादवने ६ धावांवर सौद शकीलला बाद करत पाकिस्तानला चौथा धक्का दिला. यानंतर लगेचच कुलदीप यादवने इफ्तिकार अहमदला बाद करत पाकिस्तानला पाचवा धक्का देत भारताला यश मिळवून दिले.

Accident News : भरधाव कारची ट्रकला पाठीमागून धडक; सख्ख्या बहीण-भावासह तिघांचा मृत्यू

त्यानंतर जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) मोहम्मद रिझवानला ४९ धावांवर बाद करत पाकिस्तानला सहावा धक्का दिला. यानंतर बुमराहने शादाब खानचा त्रिफळा उडवत पाकिस्तानची अवस्था ७ बाद १७१ धावा अशी केली. यानंतर हार्दिक पांड्याने नवाजला बाद करत भारताला आठवे यश प्राप्त करून दिले. तर जडेजाने हसन अलीला १२ धावांवर बाद करत पाकिस्तानला नववा झटका दिला. यानंतर जडेजाने शाहीन शहा आफ्रिदीला बाद करत पाकिस्तानचा डाव ४२.४ षटकात १९१ धावांवर गुंडाळला.

Manoj Jarange Patil Sabha : मनोज जरांगे पाटलांनी सरकारपुढे ठेवल्या ‘या’ मागण्या

दरम्यान, पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली. याशिवाय मोहम्मद रिझवानने (Mohammad Rizwan) ४९ धावांचे योगदान दिले. तर भारताकडून बुमराह, सिराज, हार्दिक, कुलदीप, रवींद्र जडेजा यांनी भेदक मारा केला. त्यामुळे आता भारताला विजयासाठी १९२ धावांची आवश्यकता आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Manoj Jarange Patil : “मराठ्यांचे पैसे खाल्ल्यामुळे…”; मनोज जरांगेंचा भुजबळांवर हल्लाबोल

- Advertisment -

ताज्या बातम्या