दिल्ली Delhi
पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांनी (डीजीएमओ) आज दुपारी ३:३५ वाजता भारतीय लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांना फोन केला. दोन्ही बाजूंनी भारतीय प्रमाणवेळेनुसार ५ वाजेपासून दोन्ही बाजूंकडून जमिनीवर, हवेत आणि समुद्र असा सर्वप्रकारचा गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. भारत सरकारचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत अधिकृतपणे घोषणा केली होती .
परंतु पाकिस्तान कडून पुन्हा अवघ्या चार तासानंतर शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले असून जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमेवर राजौरी, उधमपूर, या भागात गोळीबार सुरु केला केला आहे. दरम्यान श्रीनगरमध्ये पुन्हा स्फोटांचे आवाज येत आहेत. दरम्यान पंजाबच्या पठाणकोट मधेय देखील गोळीबार सुरु केल्याचे वृत्त आहे.
दरम्यान जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमार अब्दुल्ला यांनी आपल्या एक्स अकौंट वर पोस्ट करत म्हण्टले आहे की ‘काय झाले युद्धबंदीचे? श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत!!!’
What the hell just happened to the ceasefire? Explosions heard across Srinagar!!!
— Omar Abdullah (@OmarAbdullah) May 10, 2025