Tuesday, January 6, 2026
Homeमुख्य बातम्याPalash Muchhal : स्मृतीसोबत लग्न मोडल्यानंतर पलाश मुच्छलची पहिलीच पोस्ट; म्हणाला, "माझ्या...

Palash Muchhal : स्मृतीसोबत लग्न मोडल्यानंतर पलाश मुच्छलची पहिलीच पोस्ट; म्हणाला, “माझ्या आयुष्यात…”

एकमेकांना अनफॉलोही देखील केलं, नेमकं काय घडलं?

मुंबई | Mumbai

भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल यांचे लग्न (Marriage) अखेर मोडलं आहे. दोघांचे लग्न २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सांगली येथे होणार होते. मात्र लग्नाच्या दिवशी स्मृतीच्या वडि‍लांना हृद्य विकाराचा झटका आल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर स्मृती आणि पलाशने लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. पंरतु, आता स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लग्न मोडल्याचे (Smriti Mandhanna And Palash Muchhal) अधिकृतपणे जाहीर केले आहे.

- Advertisement -

आधी स्मृती मानधना तिच्या इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करत लग्न रद्द झाल्याची माहिती दिली होती. त्यात तिने “गेल्या काही आठवड्यांपासून माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप चर्चा आणि अफवा पसरत आहेत, म्हणून मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं. मी खूप खाजगी स्वभावाची आहे, पण एक गोष्ट स्पष्ट सांगते की लग्न रद्द झालं आहे. हा विषय इथंच थांबवायला मला आवडेल आणि तुम्ही सगळ्यांनीही तसं करावं, अशी विनंती आहे. सध्या दोन्ही कुटुंबांची गोपनीयता राखावी आणि आम्हाला आमच्या वेगाने हे सगळं समजून घेऊन पुढे जाण्यासाठी थोडी मोकळीक द्यावी. मला विश्वास आहे की आपण सर्वांना चालवणारी एक उच्च शक्ती असते आणि माझ्यासाठी ती शक्ती नेहमीच माझ्या देशाचे सर्वोच्च स्तरावर प्रतिनिधित्व करणे आणि शक्य तितकी विजेतेपदे मिळवणे हेच माझे ध्येय कायम राहील. तुमच्या सर्वांच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे.” असे म्हटले होते.

YouTube video player

त्यानंतर आता पलाशनेही सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट शेअर करत त्यांचे आयुष्यात ‘मुव्ह ऑन’ करत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे. पलाशने पोस्टमध्ये म्हटले की, “मी माझ्या आयुष्यात पुढे जाण्याचा आणि माझ्या वैयक्तिक नातेसंबंधातून मागे सरकण्याचा निर्णय घेतला आहे. लोकांनी कोणताही आधार नसलेल्या अफवांवर इतक्या सहज विश्वास ठेवून प्रतिक्रिया देताना पाहणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या गोष्टींबद्दल या अफवा पसरल्या, आणि हा माझ्या आयुष्यातला फार कठीण काळ आहे, पण मी माझ्या मूल्यांवर ठाम राहून शांतपणे याला सामोरे जाईल. असं त्याने सांगितले आहे. तसेच या पोस्टमध्ये पलाशने स्मृतीच्या नावाचा कुठेही उल्लेख केलेला दिसत नाही.

दरम्यान, स्मृती मानधना आणि पलाश यांनी लग्न लांबवणीवर पडल्यानंतर आपल्या बायोमधून हळदी आणि लग्न समारंभादरम्यानचे फोटो (Photo) हटवले होते. तसेच दोघांनीही बायोमध्ये एक खास इमोजी (दृष्ट न लागावी हे दर्शवणारी इमोजी) जोडला होता. त्यामुळे या दोघांचे स्थगित झालेले लग्न पुन्हा होणार की नाही? ही चर्चा रंगली होती. मात्र, आता स्मृती मानधना हिने पलाश मुच्छलसोबतचे लग्न रद्द केल्याने सोशल मीडियावर चर्चांना ऊत आला आहे.

ताज्या बातम्या

“दैवतं पळवण्याचा निर्लज्जपणा, गुजरातमध्ये सगळे बकासूर…”; चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ विधानावरून संजय...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहत असतानाच, केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जातीबाबत केलेल्या एका विधानाने नव्या वादाला तोंड...