NDRF च्या प्रयत्नांना यश! १८ तासांनंतर ‘त्या’ १० कामगारांची सुखरूप सुटका

jalgaon-digital
1 Min Read

मुंबई l Mumbai

राज्यात पावसानं थैमान घातलं आहे. त्यात राज्यातल्या पालघर जिल्ह्यात (Palghar District) ही पावसानं धुमाकूळ घातला आहे.

अशातच वैतरणा नदीला पूर आल्यानं १० कामगार इथं अडकून पडले होते. गेल्या १८ तासांपासून हे कामगार इथेच अडकलेले होते. अखेर एनडीआरएफच्या मदतीनं या सर्व कामगारांची सुखरुप सुटका करण्यात यश मिळालं आहे.

सध्या मुंबई बडोदा द्रुतगती महामार्गासाठी दहिसर आणि बहाडोली गावादारम्यान वैतरणा नदी पात्रात पुलाचं बांधकाम सुरू आहे. या उड्डाणपुलाचं काम सुरू असताना अचानक वैतरणा नदीला पूर आला.

त्यामुळे हे सर्व कामगार नदी पात्रात अडकले होते. त्यानंतर NDRF टीमकडून युद्धपातळीवर बचावकार्य करण्यात आलं आणि त्यानंतर या अडकलेल्या कामगारांची सुखरूप सुटका करण्यात आली.

राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठिकठिकाणी पुरात लोक वाहून गेल्याच्या घटना घडत आहेत. रस्त्यांवर दरड कोसळण्याच्या घटना तसेच पुलांवरून पुराचे पाणी वाहत असल्याने अनेक ठिकाणी रस्ते, महामार्ग बंद झाले आहेत.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *