Tuesday, April 23, 2024
Homeमुख्य बातम्यालाखोंचा पानमसाला व गुटखा जप्त

लाखोंचा पानमसाला व गुटखा जप्त

नाविन नाशिक | प्रतिनिधी

अंबड पोलिसांनी (Ambad Police Station )कोम्बिंग ऑपरेशनच्या दरम्यान पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या किराणा दुकानातून तब्बल साडेतीन लाखांचा पानमसाला गुटखा जप्त केला.

- Advertisement -

नाशिक शहरात अवैध व्यवसाय ( Illegal Tredes)राजरोसपणे सुरु असल्याने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभार स्विकारताच आयुक्तालयाच्या हद्दीतील सर्व अवैध व्यवसायांवर कारवाईचे आदेश दिले होते..

दरम्यान (दि.७) रात्री अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध व्यवसाय व रेकॉर्ड वरील गुन्हेगार तपासणीकरिता वपोनी युवराज पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली कोम्बिंग ऑपरेशन सुरु असतांना उपनिरीक्षक सुनील बिडकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अंबड पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या मुसळे ट्रेडर्स या किराणा दुकानावर पोलीस पथकाने छापा टाकत तेथील गोडाऊन मधून १० पोते विमल पानमसाला तसेच रजनीगंधा, जर्दा असलेला गुटखा असा तब्बल साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.

ही कामगिरी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की (Senior Police Inspector Yuvraj Patki )यांच्या मार्गदर्शनाखाली गून्हेशोध पथकाचे सहायक निरीक्षक वसंत खतेले, उपनिरीक्षक सुनील बिडकर, हरिसिंग पावरा, उत्तम सोनवणे,संदिप पवार यांच्यासह अधिकारी व अंमलदारांनी केली.

पंचवटी पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांनी अंबड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक पदाचा पदभार (दि.७ ) सकाळी स्वीकारला. दरम्यान पहिल्याच दिवशी त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुटखा विक्रेत्यावर अशा प्रकारे कारवाई केल्याने नवीन नाशकातून त्यांचे स्वागत होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या