राहाता |प्रतिनिधी| Rahata
राहाता ते साकुरी रोडवर (Rahata To Sakuri Road) पानमसाला (Pan Masala) व तंबाखुजन्य पदार्थ (Tobacco Products), 2 इनोव्हा, 1 स्विफ्ट डिझायर, 1 मालवाहू पॅगो व 1 मोबाईल असा एकुण 38 लाख 73 हजार 666 किंमतीचे मुद्देमाल जप्त करून पाच आरोपिंविरूध्द राहाता पोलिस ठाण्यात (Rahata Police Station) गुन्हा दाखल केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा (LCB) अहमदनगरच्या पथकाने केली. यामुळे अवैध गुटाखा विकणारांचे धाबे दणाणले आहेत.
शिर्डी लोकसभा मतदार संघ शिवसेनेचाच
पोलीस अधीक्षक राकेश ओला (SP Rakesh Ola) यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ भाऊसाहेब काळे, पोहेकॉ मनोहर गोसावी, पोना विजय ठोंबरे, गणेश भिंगारदे, पोकॉ रणजीत जाधव, रोहित मिसाळ व शिवाजी ढाकणे या पोलीस अंमलदारांचे पथक नेमून राज्यात विक्रीस प्रतिबंधीत असलेला गुटखा व पानमसाला विरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. नमुद आदेशान्वये पथक माहिती घेताना शनिवारी पोनि दिनेश आहेर यांना माहिती मिळाली आरोपी कलीम शहा हा त्याचे हस्तकामार्फत गुटखा, पानमसाला व तंबाखुची राहाता ते साकुरी रोडवरील (Rahata To Sakuri Road) पेट्रोलपंपा जवळ विक्री करीता घेवून येणार आहे.
या माहितीच्या अधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्यांनी राहाता ते साकुरी रोडवरील पेट्रोलपंपा जवळ जावुन पाहणी करता काही इसम एका मालवाहु अॅपे रिक्षामधुन दोन इनोव्हा कार व एक स्विफ्ट डिझायर कारमध्ये गोण्या भरताना दिसले. पथकाने छापा (Raid) टाकून आरोपी कलीम रहिम शहा रा. नांदुर्खी, ता. राहाता, अलीम रहिम शहा श्रीरामनगर, शिर्डी, ता. राहाता, अरबाज अजीज शेख रा. नांदुर्खी, ता. राहाता, राजु हबीब शेख रा. श्रीरामनगर, शिर्डी, ता. राहाता, अल्ताफ अब्दुल बागवान रा. दत्तनगर, ता. कोपरगांव अशा 5 आरोपींना मालासह ताब्यात घेतले.
आंतरराज्य टोळी स्थानिक गुन्हे शाखेने केली जेरबंद
आरोपींना (Accused) माल कोठुन आणला या बाबत विचारपुर केली असता त्यांनी अभय गुप्ता, रा. इंदौर, मध्यप्रदेश व प्रमोद बोथरा, रा. कोपरगांव यांचेकडुन आणल्याचे सांगितले. राज्यात विक्री व वाहतुकीस प्रतिबंधीत असलेला गुटखा, पानमसाला व तंबाखुजन्य पदार्थ, 2 इनोव्हा, 1 स्विफ्ट डिझायर, 1 मालवाहू पॅगो, 1 ओप्पो मोबाईल असा एकुण 38 लाख 73 हजार 666 किंमतीचे मुद्देमालासह ताब्यात घेवुन राहाता पोलिस ठाण्यात (Rahata Police Station) गु.र.नं. 422/23 भादवि कलम 328, 188, 272, 273, 34 प्रमाणे गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.
जम्मूतील युवकावर महिला पोलिसाने केले अंत्यसंस्कार