Thursday, September 12, 2024
HomeUncategorizedअधिक मासानिमित्त उपेक्षित वर्गातील मुलांना पंचपक्वानांची मेजवाणी!

अधिक मासानिमित्त उपेक्षित वर्गातील मुलांना पंचपक्वानांची मेजवाणी!

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यात दानधर्माला मोठे महत्त्व दिले जाते. अनेक जण धार्मिक स्थळांवर दान करतात. मात्र, आस्था जनविकास संस्थेने हे दान खऱ्या गरजूंपर्यंत पोहचविण्यासाठी ‘सत्पात्रे अन्नदान’ उपक्रमाचे आयोजन केले. या अंतर्गत चार अनाथाश्रम आणि ऊसतोड व माती कामगारांच्या ११० मुलांना मिष्ठान्न भोजनाची मेजवाणी आणि शालेय साहित्यरूपी भेटवस्तू देण्यात आल्या. संस्थेतर्फे सामाजिक बांधिलकी जपत अधिक मास साजरे करण्याचे ही चौथी वेळ आहे.

- Advertisement -

आस्था जनविकास संस्थेच्या वतीने रविवारी (२३ जुलै) उस्मानपुऱ्यातील श्री गजानन बालगृह, लायन्स बाल सदन, सातारा परिसरातील तमाशा कलावंतांच्या मुलांसाठी चालविले जाणारे सेवाश्रम, सिडकोतील शोभना निराधार मुलांचे बालगृह तसेच बीड बायपास येथे वस्ती करून राहणाऱ्या ऊसतोड व माती कामगारांच्या ११० मुलांना भोजनासाठी निमंत्रित करण्यात आले. सातारा परिसरातील मार्तंड नगरच्या येथील सरस्वती उपासनागृहात झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात ‘इतनी शक्ती हमे देना दाता’ प्रार्थनेने झाली. आस्थाच्या अध्यक्षा डॉ. आरतीश्यामल जोशी यांनी अधिक मास, त्यामागील विज्ञान आणि सामाजिक जाणिवांची माहिती दिली. चिमुकल्यांनी कलागुण सादर केले.

औक्षणाने जेवणाची सुरुवात
प्रत्येक ताटाभोवती फुलांच्या रांगोळ्या काढण्यात आल्या. सनईच्या सुरात, उदबत्त्यांच्या सुवासात मुलांचे औक्षण करण्यात आले. ‘वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे’ या श्लोकाने जेवणाला सुरुवात झाली. मुलांनी पोटभर जेवणाचा आस्वाद घेतला. नंतर त्यांना भेटवस्तूही देण्यात आल्या. आपल्या परंपरांना विरोध नाही. त्यास काळानुरूप सामाजिक अधिष्ठान देण्याची गरज आहे. यासाठी गरजूंना मिष्ठान्न जेवणासाठी निमंत्रित केल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले.  

यावेळी रुपाली करपे, मयुरी गायकवाड, मधू ठाकूर, गीता जोशी, सुषमा मोरे, अॅड. सुनंदा सनेर, प्रा. प्राजक्ता भोसले वाघ, रजनी नागवंशी, माधुरी लोणीकर, गीता व श्याम खांबेकर, आकाश देशमुख, गणेश जाधव, ज्ञोश्वर वाघ, शोभना आश्रमाच्या अध्यक्षा दीपाली सपर्ते, गजानन बाल सदनचे जयराज नारायणकर, लायन्स बालगृहाचे दीपक उंटवाल, सेवाश्रमचे प्रकल्प संचालक प्रशांत देवळे, संध्या चौगुले, मियाज चौगुले आदींची उपस्थिती होती.

उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत वाघमारे, सविता बहिरट, संगीता पाटील, प्रकाश जोशी, शशांक तांबोळी, स्वप्ना मुळे, रुपाली करपे, ज्योती व राधेय करमासे, डॉ. शकुंतला लोमटे, मधु ठाकूर, सुनील व नितू कुलकर्णी, सुषमा गोटुरकर, वंदना पंडित, सुषमा नाईक, छाया देवगिरीकर, दीप्ती बारवाल, यामिनी आसर, रेखा आसर, अनुराधा कामत, रवीकुमार पाटणकर, विजय रणदिवे, अक्षय कोडिलकर, रितू नरवडे, अॅड. ज्योती पत्की, अमृता आखाडे, मंजुषा माळवतकर, डॉ.चारुलता रोजेकर, डॉ. रेणू चव्हाण, नमिता खांबेकर, तृप्ती पालकर, देवयानी चवाथे, वैष्णवी देशमुख, जोत्स्ना पुजारी, आनंद भगारिया, रुपाली कुलकर्णी, शलाका बकरे, राधिका अवचार, समीर गुणारी, सायली शेंडगे, प्रा. प्राजक्ता भोसले वाघ, वृषाली श्रीकांत, मंजिरी संपत, अंजू मुळे, सुनीता जाधव, अर्चना सोनवणे, डॉ. शीतल बियाणी, डॉ.मधुरा मेवाड, वैशाली सद्गुले, श्रीदेवी केकांत, राहुल गोरे, मयुरी बागुल, सुलभा खंदारे, पूजा पाटील, वैभवी मुंडे, ज्योती नांदेडकर, प्रज्ञा खांबेकर, आदिती आठवले, रघुनंदन आडगावकर, मदालसा कानडे यांनी सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या