Friday, July 31, 2026
HomeनाशिकNashik News: चांदवड बाजार समितीच्या उपसभापतीपदी पंढरीनाथ खताळ यांची बिनविरोध निवड

Nashik News: चांदवड बाजार समितीच्या उपसभापतीपदी पंढरीनाथ खताळ यांची बिनविरोध निवड

चांदवड | वार्ताहर
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदांचा डॉ वैशाली जाधव यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसभापती पदावर पंढरीनाथ खताळ याची बिनविरोध निवड करण्यात आली. चांदवड बाजार समितीच्या उपसभापती पदाच्या निवडीकरीता सविता शेळके प्राधिकृत अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था चांदवड यांच्या अध्यक्षतेखाली आज शुक्रवार दि २५ रोजी सकाळी ११.३० वाजता बाजार समितीचे सभागृहात संचालक मंडळ सभेचे आयोजन करण्यात आलेले होते. यावेळी उपसभापती पदासाठी विहीत वेळेत संचालक पंढरीनाथ खताळ यांचा एकच नामनिर्देशन अर्ज प्राप्त झाले नंतर निवडणुक कार्यक्रमानुसार छाननीची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार छाननी अंती पंढरीनाथ खताळ यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आला. उपसभापती पदाकरीता विहीत वेळेत एकच अर्ज प्राप्त झाल्याने प्राधिकृत अधिकारी श्रीमती शेळके यांनी पंढरीनाथ खताळ बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले.

यावेळी बाजार समितीचे सभापती नितीन आहेर,माजी आ.शिरिषकुमार कोतवाल,माजी सभापती डॉ.आत्माराम कुंभार्डे,संचालक, डॉ.सयाजीराव गायकवाड, कारभारी आहेर, राजेंद्र दवंडे, सुखदेव जाधव, योगेश ढोमसे, विक्रम मार्कंड, संजय जाधव, वाल्मिक वानखेडे, गणेश निंबाळकर, सुशिल पलोड,रविंद्र पवार,सौ.मिना शिरसाठ,सौ.वैशाली जाधव,सचिव-गोरक्षनाथ गांगुर्डे, निवडणुक सहाय्यक नितीन पाटील आदी उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी नवनिर्वाचित उपसभापती यांचा संपुर्ण संचालक मंडळाकडून सत्कार करण्यात आला आहे. सत्काराप्रसंगी चामको बँकेचे चेअरमन राहुल कोतवाल, डॉ.शामराव जाधव, बापु शिरसाठ आदी उपस्थित होते. निवडीनंतर नवनिर्वाचित उपसभापती यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सभापती नितीन आहेर व संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विविध सामाजिक,राजकीय संस्थांच्या पदाधिकाऱ्याकडून नवनिर्वाचित उपसभापती पंढरीनाथ खताळ यांचा सत्कार करण्यात आला.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरा पाणलोटात पुन्हा पाऊस; निळवंडेतून 10209 क्युसेकने विसर्ग

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara भंडारदरा पाणलोटात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू आहे. भंडारदराचा विसर्ग, वाकी तलावाचा ओव्हरफ्लो त्यामुळे निळवंडेतही आवक वाढल्याने...