Saturday, April 26, 2025
Homeमहाराष्ट्रPandharpur-Mangalwedha Assembly By-Election 2021 : पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीची आघाडी, भाजप पिछाडीवर

Pandharpur-Mangalwedha Assembly By-Election 2021 : पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीची आघाडी, भाजप पिछाडीवर

मुंबई | Mumbai

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा आज (रविवार, 2 मे) रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होईल.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी १७ एप्रिल रोजी मतदान झाले. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भागीरत भालके आणि भाजपचे समाधान आवताडे यांच्या लढत झाली.

या पोटनिवडणुकीच्या तिसऱ्या फेरीअखेर राष्ट्रवादीचे भगीरथ भालके आघाडीवर, तर भाजपचे समाधान आवताडे पिछाडीवर आहेत. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत भाजपनं आघाडी घेतली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत मात्र राष्ट्रवादीनं मुसंडी मारल्याचं पाहायला मिळत आहे. तिसऱ्या फेरी अखेर भगीरथ भालके यांनी 650 मतांची आघाडी घेतली आहे.

Assam Election Result 2021 : भाजप आणि काँग्रेसमध्ये जोरदार चुरस

या निवडणुकीत एकूण २ लाख २४ हजार ६८ मतदारांनी मतदान केले होते. याशिवाय ८० वर्षावरील व दिव्यांग आदी ३२५२ मतदारांनी पोस्टाने मतदान केले आहे. याशिवाय ७३ सैनिकांनी देखील पोस्टाने आपला मतदानाचा हक्क बजावला असून सकाळी आठपर्यंत सैनिकांची येणारे पोस्टाची मतदान गृहीत धरली जाणार आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : सिलेंडरचा स्फोट; आगीत दहा घरांचे नुकसान

0
अंबासन । वार्ताहर Ambasan बागलाण तालुक्यातील मोराणे सांडस येथील गावालगत असलेल्या पवार वस्तीत दुपारच्या वेळेस गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या भीषण आगीत दहा पेक्षा अधिक घरांचे...