Wednesday, September 9, 2026
Homeमहाराष्ट्रPandharpur : धक्कादायक! पंढरपुरात बंदोबस्तावर आलेल्या SRPF जवानाने संपवलं आयुष्य

Pandharpur : धक्कादायक! पंढरपुरात बंदोबस्तावर आलेल्या SRPF जवानाने संपवलं आयुष्य

पंढरपुर । Pandharpur

आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर विठूरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण पंढरी नगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली असतानाच, एका दुर्दैवी घटनेने परिसर सुन्न झाला आहे. आषाढी वारीच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या राज्य राखीव पोलिस दलाच्या (SRPF) एका जवानाने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, रामेश्वर ध्रुपद साबणे असे आत्महत्या केलेल्या जवानाचे नाव आहे. लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी पंढरपुरात SRPF ची तुकडी तैनात करण्यात आली होती. शुक्रवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा सुरू असतानाच ही घटना घडली. जवानाने आपल्या सेवेतील शस्त्रातून स्वतःवर गोळ्या झाडल्या. गोळीचा प्रचंड आवाज होताच सहकाऱ्यांनी त्या दिशेने धाव घेतली; मात्र गंभीर दुखापतीमुळे रामेश्वर साबणे यांचा जागीच मृत्यू झाला होता. आषाढीच्या दिवशी आणि विठुरायाच्या महापूजेच्याच वेळी घडलेल्या या अत्यंत दुर्दैवी प्रसंगाने बंदोबस्तावर असलेल्या पोलिस दलात आणि भाविकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

जवानाने हे अत्यंत टोकाचे पाऊल कोणत्या कारणातून उचलले, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मानसिक ताणतणाव, कौटुंबिक प्रश्न किंवा इतर काही कारण आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतदेह उत्तर तपासणीसाठी (Post-mortem) रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पंढरपूर पोलिस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

अणुवीज प्रकल्पात ७९ हजार कोटींची गुंतवणूक होणार

0
मुंबई / प्रतिनिधी Mumbai वीज निर्मिती क्षेत्रातील टोरेंट पॉवर आणि जेएसडब्ल्यू एनर्जी लिमिटेड या दोन कंपन्या राज्यात अणुवीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्याच्या तयारीत आहेत. या दोन्ही...