Friday, April 25, 2025
HomeराजकीयPankaja Munde: "चार-पाच महिने गप्प बसले, पण आता…", पंकजा मुंडे कोणावर भडकल्या?

Pankaja Munde: “चार-पाच महिने गप्प बसले, पण आता…”, पंकजा मुंडे कोणावर भडकल्या?

मुंबई । Mumbai

आमदार सुरेश धस गेल्या काही दिवसांपासून मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यावर जाहिरपणे टिका करताना दिसत आहेत. यासोबतच त्यांनी थेट काही आरोपही केली आहेत.

- Advertisement -

विधानसभा निवडणुकीमध्ये आष्टीत पंकजा मुंडे यांनी पक्षाचे काम केले नसून अपक्ष उमेदवाराचे काम केल्याचा आरोप हा सुरेश धसांकडून सातत्याने केला जातो. हेच नाही तर पक्षाचे काम न केल्याने त्यांच्यावर कारवाई व्हावी, असेही बोलताना मध्यंतरी धस दिसले होते. बीडच्या प्रश्नावर विचारले असता पंकजा मुंडे यांनी मला ते विचारू नका म्हटले होते. यावरही सुरेश धस यांनी टीका केली होती.

आता पंकजा मुंडे या सुरेश धस यांच्याबद्दल बोलताना दिसल्या आहेत. पक्षश्रेष्ठींनी सुरेश धस यांना समज द्यावी, असं तुम्ही बोललात का? त्यावर पंकजा मुंडे यांनी उत्तर दिलं. “ते माझ नाव घेऊन जी चर्चा करतायत, त्यावर मी माझ्या पक्षातील श्रेष्ठींशी म्हणजे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली. ज्या विषयाशी कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं, टिप्पणी करणं त्यांच्याकडून अपेक्षित नाही. पक्षाच्या भूमिकेला ठेच पोहूच नये, म्हणून मी चार-पाच महिने गप्प बसले, पण आता पक्षश्रेष्ठींना विनंती केलीय की, त्यांना समज द्यावी” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

विधान सभेला तुम्ही पक्षविरोधी भूमिका घेतली असा त्यांचा आरोप आहे. त्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या की, “मी प्रचार केलाय की नाही तुम्ही रेकॉर्डवर जाऊन पहा . या राज्यात अनेक लोक भाजपशी निगडीत होते, ते अपक्ष उभे राहिले. मंचावर जाऊन मतदानाची मी विनंती केलेली आहे. त्यांनी केलेला आरोप चुकीचा आहे” “त्यांनी असा आरोप करायला नको होता. प्रचार करताना त्यांनी माझ्याशिवाय दुसऱ्या कुठल्या नेत्याचं नाव घेतलं नाही. त्यामुळे निकाल लागल्यावर असे आरोप करणं, जो व्यक्ती 75 हजार मतांनी निवडून आलाय, काम केलं नाही, तर कसं शक्य होईल याचं त्यांनी आत्मपरिक्षण करावं” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

“लोकसभेला जे माझं लीड होतं, ते अर्ध्यापेक्षा कमी झालं, मग त्यांनी माझं काम केलं नाही असं म्हणायच का?. त्यांनी जाहीरपणे असं बोलण हे पक्ष श्रेष्ठींना, पक्ष शिस्तीला मान्य नाही. निवडून आल्यावर त्याच गुलालात माझ्या विषयी बोलले. विधानसभेचा निकाल 23 नोव्हेंबरला लागला तेव्हापासून 12 मार्च म्हणजे आजपर्यंत बोलण्याच टाळलं. पक्षश्रेष्ठींना विनंती केलीय की, त्यांना समज द्यावी हे खरं आहे” असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...