Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्यामी संघर्ष कन्या, मी कुणासमोर झुकणार नाही; भक्तीगडावरुन पंकजा मुंडेंचा एल्गार

मी संघर्ष कन्या, मी कुणासमोर झुकणार नाही; भक्तीगडावरुन पंकजा मुंडेंचा एल्गार

बीड | Beed

भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी भगवान गडावरील दसरा मेळाव्यात विचारांना मोकळी वाट करून दिली. यावेळी त्यांनी राजकीय संघार्षाचा पाढा वाचला.

- Advertisement -

‘मी संघर्ष कन्या आहे, माझा संघर्षाचा वारसा आहे, मी संघर्ष करणार. जोडे उचरणाऱ्यांचं कधीच इतिहासात नाव झालं आहे. त्यामुळे संघर्ष हा प्रत्येकाला आहे. गोपीनाथ मुंडेंची मी लेक आहे. त्यामुळे संघर्ष मला नवीन नाही. संघर्ष मी नाकारणार नाही.’ पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणात संघर्षाचा उल्लेख केला मात्र त्यांचा रोख कुणावर? हा प्रश्न अता उपस्थित होत आहे.

‘जे गोपीनाथ मुंडेंची विरोधक होते, ज्यांनी मला विरोध केला, पातळी सोडून माझ्यावर टीका केली त्यांच्यावर मी बोलले नाही, कधी कोणावर वैयक्तिक आरोप केले नाहीत, खालच्या पातळीवर टीका केली नाही. कुणी काही चुकलं तर त्या व्यक्तीवर बोलायला संधीचा फायदा घेतला नाही. ते आमच्या रक्तातच नाही’, असंही त्या आपल्या भाषणात म्हणाल्या.

तसेच, ‘पक्षामध्ये मी नाराज नाही. माझी कोणावरही नाराजी नाही. कार्यकर्त्यांनीही पंकजा मुंडे यांना आमदारकी द्यावी अशी मागणी करणे बंद करा. पक्षाचा एक नियम आहे. पक्षाची शिस्त आहे. राजा असो की रंक. भाजपमध्ये जे जे असतात त्यांना पक्षाची शिस्त लागू होते. त्यामुळे उगाचच आग्रह करु नका. मी आता थेट २०२४ च्या तयारीला लागली आहे. त्यामुळे तुम्हीही २०२४ च्या तयारीला लागा, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी विधानसभा निवडणूक २०२४ (Assembly Election 2024) चे रणशिंग फुंकले आणि विधानसभा उमेदवारीसाठी दावेदारीही केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या