Sunday, May 10, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai News: डॉक्टर गौरी गर्जे प्रकरणात पती अनंत गर्जेला पुन्हा अटक

Mumbai News: डॉक्टर गौरी गर्जे प्रकरणात पती अनंत गर्जेला पुन्हा अटक

मुंबई । Mumbai

भाजपच्या आमदार आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक (PA) अनंत गर्जे यांना गौरी गर्जे मृत्यू प्रकरणात राज्याच्या विशेष तपास पथकाने (SIT) पुन्हा अटक केली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि तपास प्रक्रियेत मोठी खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी गर्जे यांनी त्यांच्या वरळी येथील निवासस्थानी गळफास लावून आत्महत्या केली होती. एका राजकीय व्यक्तीशी संबंध असलेल्या व्यक्तीच्या उच्चशिक्षित पत्नीने टोकाचे पाऊल उचलल्याने हे प्रकरण चर्चेत आले होते. गौरी गर्जे यांच्या आत्महत्येनंतर वरळी पोलिसांनी त्यांचे पती अनंत गर्जे यांना तात्काळ अटक केली होती. मात्र, गौरीच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप केला होता.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याची घोषणा केली होती. याच एसआयटीने आता अनंत गर्जे यांना दुसऱ्यांदा अटक करून मोठी कारवाई केली आहे. गौरी गर्जे मृत्यू प्रकरण समोर आल्यानंतर वरळी पोलिसांनी तासाभरातच गर्जे यांना अटक केली होती. तेव्हापासून ते पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडीत आहेत. वरळी पोलिसांनी दाखल केलेल्या मूळ प्रकरणात त्यांना अद्याप जामीन मिळालेला नाही. अशा परिस्थितीत, मुख्यमंत्र्यांनी स्थापन केलेल्या एसआयटीने त्यांना पुन्हा अटक केली आहे.

ही दुसरी अटक एसआयटीच्या स्वतंत्र तपासाचा भाग आहे. डीसीपी रागसुधा यांच्या नेतृत्वाखालील एसआयटी पुढील तपास करत आहे. एसआयटीच्या या कारवाईमुळे या प्रकरणाला आता वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. अनंत गर्जे यांना एसआयटीच्या अटकेनंतर आज पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात येणार आहे. एसआयटी गर्जे यांची कोठडी मागण्याची शक्यता आहे. एसआयटीच्या तपासात आता कोणती नवीन माहिती समोर येते आणि या प्रकरणाचे गूढ कसे उलगडते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

ताज्या बातम्या

Shirdi : अशोक खरातची रवानगी नाशिक कारागृहात

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi शिर्डी आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत असलेल्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी अशोक खरात याच्या अडचणीत वाढ झाली...