Tuesday, October 22, 2024
Homeनगरजातीवर स्वार होणार्‍यांच्या पाठीशी उभं राहायचं नाही

जातीवर स्वार होणार्‍यांच्या पाठीशी उभं राहायचं नाही

भगवानगडावरुन पंकजा मुंडेंचा टोला

अहिल्यानगर |पाथर्डी| Ahilyanagar |Pathardi

आम्हाला अधिकार्‍याचा सीआर पाहूनच त्याला काम द्यायचंय, त्याची जात बघून देणार्‍याची औलाद गोपीनाथ मुंडेंची नाही. आम्हाला काम करणार्‍या लोकांच्या पाठीशी उभं राहायचं आहे. जातीवर स्वार होणार्‍यांच्या पाठीशी उभं राहायचं नाही, असा टोला भाजप नेत्या आ. पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता लगावला आहे. पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावर आ. पंकजा मुंडे यांचा मेळावा झाला. सध्याच्या जातीय राजकारणवर त्यांनी भाष्य केलं. यावेळी नाव न घेता त्यांनी मनोज जरांगेंना अप्रत्यक्षपणे लक्ष केलं. छत्रपतींच्या घराण्यानेही गोपीनाथ मुंडे यांच्यावर प्रेम केलं.

- Advertisement -

माझ्यावरही छत्रपतींच्या घराण्यातून प्रेम केलं जातं. छत्रपती उदयनराजेंनी त्यांच्या देवघरात माझ्या हातून पूजा केली. पण, आज समाजाला काय झाल आहे? एखाद्याला एखाद्या गाडीने उडवलं तर, लोकं विचारतात गाडीच्या ड्रायव्हरची जात काय? आज एखाद्या मुलीवर अत्याचार झाला, तर लोक विचारतात त्या नराधमाची जात काय आणि मुलीची जात काय? हा असा समाज घडविण्यासाठी आम्ही आमच्या आयुष्यातील वर्षे खर्च केली नाहीत. मला या देशात आणि राज्यात एखाद्यानं अधिकार्‍याचं नाव घेऊन फाईल आणली की ते म्हणतात, ताई आपला जवळचा आहे, आपला पाहुणा आहे. पण, त्याच्यावर विनयभंगाची केस असेल तर कसला पाहुणा?, असे म्हणत पंकजा मुंडेंनी सध्याच्या जातीय राजकारणावर भाष्य केलं.

राज्यात कुठंही अन्याय झालं तर येणार
शिवरायांनी मावळ्यांची मोठ बांधली म्हणून स्वराज्य स्थापन झालं. लाडकी बहीण आज म्हणतात पण लाडक्या बहिणींना शिकवण्याचा आणि ताकद देण्याचे काम सवित्रीबाईंनी केलं. संपूर्ण राज्यातून आलेले अठरा पगड जातींचे माझे बांधव आहेत. राज्यात कुठंही कोणावर अन्याय झाला तर तिथं येणार आहे.

मतदानाशिवाय ऊस तोडायला जायचं नाही
मतदान केल्याशिवाय कोणीही ऊस तोडायला जायचं नाही, हे वचन मला द्या. ऊस तोड कामगारांचे जीवन बदलल्याशिवाय शेवटचा श्वास घेणार नाही, असेही त्या म्हणाल्या. मुंडेंनी निवडणूकपूर्व महाराष्ट्र दौर्‍याचे संकेत यावेळी दिले. मतदान केल्याशिवाय जाऊ नका. आपण हरल्यामुळे नाराज होऊ नका, असे आवाहन देखील पंकजा मुंडे यांनी केले आहे.

ज्याचा वारसा त्याने चालवावा
दसरा मेळाव्यातून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगेंवर नाव न घेता टीका केली. 12 वर्षांच्या काळात मतभेद असतानाही माझ्या बहिणीच्या पाठीमागे उभा राहिलो. ज्याला जो वारसा दिलाय आहे. तो त्याने चालवायला पाहिजे. मात्र नवीन मेळावा सुरु करून कोणीही या मेळाव्याची पवित्रता संपवू शकत नाही, अशी टीका धनंजय मुंडे यांनीजरांगे यांच्यावर नाव न घेता केली आहे.

भगवान बाबांच्या अस्तित्वाला कोणाची गरज नाही- नामदेव शास्त्री
पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याबाबत भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गडाच्या दसर्‍या मेळाव्याला 73 वर्ष पुर्ण होत आहेत. मलाच राजकीय भाषण नको होतं. पंकजा आणि धनंजय या दोघांचा संघर्ष हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे. भगवान बाबाच्या अस्तित्वाला कोणाची गरज नाही म्हणून मी हा मेळावा बंद केला, अशी प्रतिक्रिया भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी दिली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या