Thursday, May 15, 2025
Homeधुळेआर्वीत ट्रकसह 26 लाखांचा पानमसाला जप्त

आर्वीत ट्रकसह 26 लाखांचा पानमसाला जप्त

धुळे Dhule । प्रतिनिधी

- Advertisement -

तालुका पोलिसांनी (Taluka Police) आर्वी शिवारात (Arvi Shivarat) सापळा लावून (setting a trap)अवैधरित्या (Illegally) होणारी रजनीगंधा पानमसाला गुटखा (Rajnigandha Panmasala Gutkha) व तंबाखूची (tobacco) वाहतूक उघड केली. ट्रकसह पानमसाला (Panmasala with truck) (गुटखा) आणि तंबाखूचा (tobacco) असा एकूण 26 लाखांचा मुद्देमाल जप्त (Confiscation of goods) केला. दोन दिवसांपूर्वीच तालुका पोलिसांनी मांडळ शिवारातील गांजा शेतीवर कारवाई केली, अशी माहिती आज पोलिस अधिक्षक संजय बारकुंड यांनी पत्रपरिषदेत दिली.प्रसंगी पोलिसांच्या या कामगिरीचेही कौतूक केले.

Breaking News : संतनगरीत राहुल गांधी म्हणाले : भाजपा देशात हिंसा पसरवित आहे !

धुळे मार्गे मुंबई- आग्रा महामार्गाने आयशर ट्रकमधून (क्र.एम.पी.013 जी.ए.9505) बेकायदेशीररित्या रजनीगंधा पानमसाला गुटख्याची वाहतुक केली जाणार असल्याची गुप्त माहिती काल धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने रात्री सापळा लावून आर्वी दुरक्षेत्र येथे ट्रकला पकडले.

अरेच्च्या… पैसे घेतल्या शिवाय नगरचना विभागाचे अधिकारी कामच करत नाहीतमहिनाभरातील उत्पादनापेक्षा तुपाची दुप्पट विक्रीटवाळखोरांनी बसमध्ये काढली विद्यार्थिनींची छेडघरकुल अनुदान घोटाळा : दिशा समितीच्या बैठकीत चौकशीचे आदेशः खा.डॉ.हीना गावित

तपासणी केली असता त्यात पांढर्‍या व खाकी रंगाच्या गोण्यांमध्ये रजनीगंधा पानमसाला (गुटखा) व तुलसी तंबाखुचे एकूण 12 पार्सल आढळून आले. 13 लाख 99 हजार 680 रुपये किंमतीचा रजनीगंधा पानमसाला (गुटखा) एकूण 12 पार्सल बॉक्स, 1 लाख 55 हजार 520 रूपये किंमतीचा रजनीगंधा पानमसाल्याचे 3 पार्सल खाकी बॉक्स, 3 लाख 76 हजार 320 रुपये किंमतीची तुलसी तंबाखुचे 2 पार्सल बॉक्स व 7 लाखांचे आयशर वाहन असा एकुण 26 लाख 31 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला.

VISUAL STORY : तिच्या सौंदर्यासोबतच तीने दिलेल्या ‘या’ प्रश्नाच्या उत्तराने 1994 मध्ये ती बनली होती ‘विश्व सुंदरी’

याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाला अहवाल देण्यात आला आहे. त्यानुसार गुन्हा नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.

VISUAL STORY : वय 55, तरीही तीला पाहताच उरात होतेय ‘धकधक’….

ही कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील, पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळेे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, पोहेकॉ प्रविण पाटील, किशोर खैरनार, पोना मुकेश पवार, पोकॉ नितीन दिवसे यांच्या पथकाने केली.

VISUAL STORY : हिरवी साडी, कपाळावर कुंकू, भडक लिपस्टिक झुमके, बांगड्या घालून दिसला ‘हा’ अभिनेतादोन वर्षापासुन पळवून घेवून गेलेल्या मुलीची गुजरातमधून सुटका

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या