Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशनिमलष्करी दलांच्या कॅन्टीनमध्ये फक्त ‘स्वदेशी’ वस्तूंचीच होणार विक्री

निमलष्करी दलांच्या कॅन्टीनमध्ये फक्त ‘स्वदेशी’ वस्तूंचीच होणार विक्री

सार्वमत

नवी दिल्ली – केंद्रीय राखीव पोलिस दल आणि सीमा सुरक्षा दल यांसह  निमलष्करी दलांच्या देशभरातील कॅन्टीनमध्ये येत्या 1 जूनपासून फक्त स्वदेशी वस्तूंचीच विक्री होणार आहे. आत्मनिर्भर भारत अभियान सुरु करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी ही घोषणा केली आहे. त्यांनी ट्विटरवर याबाबत माहिती दिली. तसंच देशात बनवलेल्या वस्तूंचाच अधिकाधिक वापर करण्याचं आवाहन त्यांनी केलं.

- Advertisement -

ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री आठ वाजता देशवासीयांसोबत दूरदर्शनवरून साधलेल्या संवादात, नागरिकांना स्वदेशी वस्तूच खरेदी करण्याचा आणि स्वत:सोबतच देशालाही आत्मनिर्भर करण्याचा सल्ला दिला. याच अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय कृती सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलिस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, आयटीबीपी, सीमा सुरक्षा बल, एनएसजी आणि आसाम रायफल्स यासारख्या केंद्रीय दलांच्या कॅन्टीनमधून दरवर्षी सुमारे 2800 कोटी रुपयांच्या वस्तूंची विक्री केली जाते. आपण सर्वांनीच जर स्वदेशी वस्तूंच्याच खरेदीवर भर दिला, तर भविष्यात भारत जगातील सर्वांत मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास येऊ शकते, मी देशातील जनतेने स्वदेशी वस्तूंचाच जास्तीत जास्त वापर करावा आणि इतरांनाही यासाठी प्रोत्साहित करण्याचं आवाहन मी करतो. प्रत्येक भारतीयाने जर स्वदेशी उत्पादनांचा वापर करण्याचा संकल्प केला तर आगामी पाच वर्षात देशाची लोकशाही स्वावलंबी बनू शकते असेही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या