Friday, July 19, 2024
Homeनगरआई-वडीलांचा संभाळ न करणार्‍या कर्मचार्‍यांचा पगार कापणार

आई-वडीलांचा संभाळ न करणार्‍या कर्मचार्‍यांचा पगार कापणार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

जिल्हा परिषदेचे जे कर्मचारी आई-वडिलांचा संभाळ करीत नाहीत. त्या कर्मचार्‍या पगारातील 30 टक्के रक्कम कपात करून

ती आई-वडीलांच्या खात्यावर जमा करण्याचा महत्वपूर्ण निर्णयास जिल्हा परिषदेच्या तहकूब सभेत सर्वानुमते तत्त्वता मान्यता देण्यात आली. सभेच्या सुरूवातीला जिल्हा परिषदेचे सदस्य अनिल कराळे यांचे अकास्मित निधन झाल्याबद्दल त्यांना सभागृहातर्फे श्रध्दांजली वाहण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी ही सभा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. नगर जिल्ह्यात 12 हजार प्राथमिक शिक्षकांसह 18 हजार एकूण जिल्हा परिषद कर्मचारी आहेत. तसेच आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्यसेवक महिला व पुरुष यांची यांच्यासह सर्व कर्मचार्‍यांची संख्या 55 हजार होत आहे.

या कर्मचार्‍यांमध्ये जे कर्मचारी आई-वडिलांचा संभाळ करीत नाहीत. त्या आई-वडिलांनी मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे तक्रार केल्यानंतर त्याची सुनावणी होऊन त्या कर्मचार्‍यांच्या पगार कपातीचा निर्णय होऊन त्याच्या खात्यातून 30 टक्के रक्कम आई-वडिलांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. हा विषय जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी मांडला होता. तो सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे.

यावेळी सभेची नोटीस 11 तारखेला काढली असल्याचे प्रशासनाने दाखविले आहे. परंतु नोटीस 25 तारखेला सदस्यांना कशी मिळाली, असा सवाल परजणे यांच्यासह इतर सदस्यांनी उपस्थित केला. त्यावर सभापती सुनील गडाख यांनी यापुढे अशा चुका होऊन देऊ नका, अशी सूचना सामान्य प्रशासन विभागाला केल्या.

त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडला. कांतीलाल घोडके यांनी शाळा खोल्यांचे निर्लेखन करम्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यावर उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा खोल्यांचे निर्लेखन करण्यास मंजूरी दिल्याचे सांगितले.

लालटाकी येथील बांधकामाला विरोध नाही पण घसारा निधी जर बांधकामावर खर्च केला तर सगळे संपून जाईल, असे परजणे यांनी म्हटले. तसेच पंचायत स्तरावरील घसारा निधी येत नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

त्याबरोबर सभापतींच्या वाहनांसाठी निधीची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. त्यावर सभापती गडाख म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागाने लेखा शिर्षनिहाय घसारा निधी देणे आवश्यक आहे. याबाबतचे नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सदस्यांना सांगितले.

वाहन चालकांना किमान पगार : सीईओ

रुग्ण वाहिका चालकांना गेल्या अनेक दिवसांपासून पगार थकलेले आहेत. ठेकेदारालाच पैसे शासनाकडून न आल्याने ते मिळालेले नसले तरी त्याने पैेसे दिलेले आहेत. रुग्ण वाहिकेवरील चालकांना किमान वेतन द्यावे, अशी मागणी जिल्हा परिषदे सदस्य राजेश परजणे, जालिंदर वाकचौरे यांनी केली होती. त्यावर साधाकबाधक चर्चा झाली. परजणे यांनी रुग्ण वाहिकेवरील चालकांना जिल्हा परिषदेने कंत्राटी कर्मचारी म्हणून कामावर घ्यावे, अशी मागणी केली. त्यावर इतर जिल्हा परिषदांचे दाखलेही दिले. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर म्हणाल, वाहनचालकांना किमान वेतन मिळावे, यासाठी आपण आगामी टेंडरमध्ये तशी नोंद करण्यात येणार आहे. एक वर्षांपासून ठेकेदाराला पैसे अदा करता आलेले नाही. आता पैसे आलेले आहेत, ते अदा करता येतील. चालकांच्या पगाराचा प्रश्‍न मार्गी लागणार आहे.

पुतळ्या ऐवजी जयंती साजरी करणार

जिल्हा परिषदेमध्ये कर्मवीर शंकरराव काळे यांचा पुतळा जिल्हा परिषदेमध्ये उभारण्याचा विषय सभेत ठेवण्यात आलेला होता. त्यावर सभेत चर्चा झाली. राहाता तालुक्यातील जिल्हा परिष सदस्य अ‍ॅड. रोहिणी निघुते यांनी पदमभूषण बाळासाहेब विखे पाटील यांचाही पुतळा उभारण्याची मागणी केली. त्यांच्या पाठोपाठ जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे यांनीही सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांचाही पुतळा जिल्हा परिदेच्या आवारात उभारण्यात यावा, अशी मागणी केली. त्यावर अर्थ व पशुसंवर्धन सभापती सुनील गडाख म्हणाले की, सभेत हा विषय येण्याअगोदर पदाधिकार्‍यांची चर्चा झालेली असून तूर्त हा विषय जैसे थे ठेवण्यात आला आहे. त्याऐवजी जिल्ह्याच्या योगदात ज्याज्या ज्येष्ठ नेत्यांनी योगदान दिलेले आहे. त्या सर्वांची जयंती व पुण्यतिथी जिल्हा परिषदेत साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या