Friday, May 3, 2024
Homeनाशिकशालेय फी माफ करण्याची पालकांची मागणी

शालेय फी माफ करण्याची पालकांची मागणी

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पालकांच्या अडचणी लक्षात घेऊन शाळेने फी माफ करावी.शाळा बंद असलेल्या कालावधीतील बस व व्हॅन यांची देखील फी आकारण्यात येऊ नये,अशी मागणी आदर्श शाळेच्या पालकांनी विश्वस्त, बाल विद्या प्रसारक मंडळ नाशिक यांच्याकडे केली आहे.

- Advertisement -

निवेदनात म्हटले आहे की,आमची मुले आपल्या संस्थेच्या आदर्श इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये शिकत आहेत. आम्ही सर्व पालक मध्यमवर्गीय कुटुंबातील आहोत. परंतु चालु वर्षी कोविड- १९ या अतिभयंकर विषाणुचा प्रादुर्भाव संपुर्ण जगात झाला व त्याबरोबरच देशात याचा उद्रेक सुरुच आहे. या कालावधीत महाराष्ट्र शासनाचे २३ मार्च २०२० पासून लाॅकडाऊनचे सत्र सुरू आहे. त्या अनुषंगाने शासनाने सर्व शाळा, काॅलेज, खाजगी कार्यालये, कंपन्या, दुकाने ही बंद ठेवण्यात आली असल्याने बऱ्याच पालकांना याचा सामना करावा लागला आहे .

बऱ्याच पालकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत, नोकरी वरुन पगार मिळत नाही, काही पालकांच्या नोक-या देखील गेल्या आहेत. इतर व्यापारी दुकाने, वाहतुक बंद आहे.त्यामुळे जवळपास सर्वच पालकांना याचा मोठा फटका बसला आहे आणि सर्व पालक कशीबशी गुजराण करत आहेत. त्यामुळे सर्व पालकांची परिस्थिती ही हालाखीची व आर्थिक अडचणीची झाली आहे.पालकांच्या अडचणी लक्षात घेऊन शाळेने फी माफ करावी व बंद असलेल्या कालावधीतील बस व व्हॅन यांची देखील फी आकारण्यात येऊ नये,अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदन देताना ॲड.अमोल घुगे, एस. ए. दिक्षीत, ज्योती कोळी, इब्राहिम अत्तार, ॲड. किरण वांद्रे, सुमंत वैद्य, अनिल आखाडे, पुनम राऊत, पुनम ठाकुर , शांताराम शेवाळे, माधुरी मोझर, अमोल काळे, सुधीर पुराणिक, प्रतिक्षा वाघ, राहुल घुगे, मयुरेश गांगल, हेमंत काजळे, ज्योती नवसे, संतोष देवरे, प्रदिप हटकर, प्रदिप ऐनवेळे, समिर तांबट, अंजली सोनजे, मयुरी सोनवणे आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या