श्रीगोंदा |प्रतिनिधी| Shrigonda
तालुक्यातील पारगाव सुद्रिक (Pargav Sudrik) येथे काल (20) रात्री झालेल्या मोटरसायकल, रुग्णवाहिका आणि चारचाकी वाहनांच्या दोन वेगवेगळ्या अपघातात (Accident) विकास दादा वाकळे, गणेश छबु वाकळे व लक्ष्मण नारायण भेसर हे तीन तरुण ठार (Death) झाले तर रुग्णवाहिका (Ambulance) चालक अक्षय गायकवाड (रा. श्रीगोंदा), दादा रामा भेसर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवारी 20 रोजी रात्री10.30 च्या सुमारास विकास दादा वाकळे (वय 22), गणेश छबु वाकळे (वय 28), लक्ष्मण नारायण भेसर (वय 42) हे तीनजण पारगावातून मोटरसायकल (क्रमांक एमएच 03 बीयू 6516) वरून पेट्रोल पंपाकडे जात असतांना तेथील नदीत त्यांची गाडी घसरून पडली. या अपघातात जखमींना (Injured) श्रीगोंदा येथे नेण्यासाठी दोन रुग्णवाहिका बोलविण्यात आल्या. एका रुग्णवाहिकेतून जखमी विकास वाकळे आणि गणेश वाकळे यांना श्रीगोंदा (Shrigonda) येथील हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र उपचारापूर्वीच त्या दोघांची प्राणज्योत मालवली. तर दुसरी रुग्णवाहिका (Ambulance) (एमएच 09 बीसी 1784) जखमी लक्ष्मण नारायण भेसर यांना श्रीगोंदा येथे उपचारासाठी घेऊन जात असतांना पारगाव शिवारात समोरून आलेल्या कारने ( एमएच 39 जे 9252) ने जोराची धडक (Hit) दिली. ही धडक एवढी जोराची होती की रुग्णवाहिकेची रस्त्याची दिशा बदलली. या अपघातात (Accident) लक्ष्मण भेसर हे ठार झाले तर त्यांचा पुतण्या दादा भेसर व रुग्णवाहिका चालक अक्षय गायकवाड गंभीर हे दोघे जखमी (Injured) झाले आहेत. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पारगावला मोठ्या अपघाताचा दुसरा धक्का
चार महिन्यांपूर्वी आळंदीहून येणार्या पारगावच्या चार भविकांचा अपघातात मृत्यू (Death) झाला होता. तर शुक्रवारी झालेल्या अपघातात पारगावच्या तीन तरुणांचा अपघातात मृत्यू (Death) झाल्याने चार महिन्यांत दोनदा पारगाव शोकसागरात बुडाले आहे.