Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजParis Olympics 2024 : सर्वेश कुशारे यशस्वी होण्यासाठी प्रार्थना

Paris Olympics 2024 : सर्वेश कुशारे यशस्वी होण्यासाठी प्रार्थना

महादेवनगर। वार्ताहर Mahadevnagar / Devgaon

- Advertisement -

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उंच उडी क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणारे सर्वेश कुशारेसाठी त्याचे शालेय शिक्षण झालेल्या श्री.डी.आर. भोसले विद्यालयात व जन्मगाव असलेल्या देवगाव गावात मंगळवार (दि.6) प्रार्थना करण्यात आली. यावेळी त्याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून आमच्यासह देशवासियांचे स्वप्न पूर्ण करावे, अशी अपेक्षा विद्यार्थी, गावकरी व सर्वेश कुशारेच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.

सर्वेशची ऑलिंपिक स्पर्धेतील प्राथमिक पात्रता फेरी बुधवार (दि.7) भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजून 35 मिनिटांनी होणार आहे. या फेरीत त्याला यश मिळावे व पुढील स्पर्धा जिंकण्यासाठी सर्वेशला पाठबळ आणि प्रोत्साहन मिळावे म्हणून उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो आणि परमेश्वर आपणांस यशस्वी होण्यासाठी पंखात बळ देवो. आपणास उद्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळावे, हीच ग्रामस्थ व विद्यालय परिवाराकडून अनंत शुभेच्छा अशी प्रार्थना करण्यात आली.

यावेळी मंडळ अधिकारी ज्ञानेश्वर पगार, माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब बोचरे, माजी पोलीस पाटील भास्कर बोचरे, जयवंत लोहारकर, सर्वेशचे वडील अनिल कुशारे, मनोहर बोचरे, राजेंद्र बोचरे, धनजंय जोशी, संपत आढांगळे, सामाजिक कार्यकर्ते वसंत आढांगळे, सचिन गायकवाड, प्राचार्य के.एम. गाजरे, पर्यवेक्षक बी.के. उफाडे आदींसह शिक्षक, ग्रामस्थ उपस्थित होते. उपशिक्षक डी.बी. आहेर यांनी सूत्रसंचालन केले.

उद्या होणार्‍या ऑलिंपिक स्पर्धेची विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना उत्कंठा लागली असून आमच्या श्री.डी.आर. भोसले विद्यालयाचा सर्वेश विद्यार्थी असल्याचा अभिमान आहे. सुवर्णपदक मिळावे यासाठी शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी यांनी देवाकडे प्रार्थना केली.
भाऊसाहेब बोचरे, अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती, देवगाव

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या