Friday, September 20, 2024
Homeक्रीडाParis Olympics मध्ये भारताला आणखी एक पदक, Manu Bhaker ने रचला इतिहास!

Paris Olympics मध्ये भारताला आणखी एक पदक, Manu Bhaker ने रचला इतिहास!

पॅरिस | Paris

- Advertisement -

भारताची नेमबाजपट्टू मनू भाकर (Manu Bhaker) हिने महिलांच्या १० मीटर एअर पिस्टल नेमबाजीत कांस्यपदकाला (bronze) जिंकल्यानंतर अजून एका पदकाची कमाई केली आहे. मनू भाकर आणि सरबज्योत सिंग (Sarabjot Singh) यांनी १० मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक स्पर्धेत दक्षिण कोरियाला पराभूत करताना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) भारताचं दुसरं पदक जिंकलं आहे.

मनू भाकर-सरबजोत सिंग जोडीनं दक्षिण कोरियाच्या ली वोन्हो आणि ओह ये जीन जोडीचा १६-१० असा पराभव केला. अत्यंत चुरशीनं झालेल्या ब्रॉन्झ मेडलच्या या लढतीमध्ये दक्षिण कोरियन जोडीनं पहिला राऊंड जिंकला होता. त्यानंतर मनू आणि सरबजोत यांनी कमबॅक केलं. (Paris Olympics 2024 Manu Bhaker And Sarabjot Singh Win Bronze In The 10m Air Pistol Mixed Team Event)

हे देखील वाचा : Kerala Landslide News : केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलन; ११ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले

या दोघांनी ८-२ अशी आघाडी घेतली. त्यानंतर दक्षिण कोरियन जोडीनं पुन्हा एकदा प्रतिकार करत ही आघाडी कमी केली. पण, त्यांना मनू भाकर-सरबजोत सिंग यांना मागं टाकता आलं नाही. अखेर मनू भाकर-सरबजोत सिंग जोडीनं विजयी लक्ष्य गाठत भारताला आणखी एक पदक मिळवून दिलं आहे.

दरम्यान मनू भाकरने या विजयासह इतिहास रचला आहे. एकाच ऑलिम्पिक दोन पदके जिंकणारी ती भारताची पहिली नेमबाज ठरली आहे. याआधी रविवारी मनू भाकरने १० मीटर एअर पिस्तूल महिला एकेरीत कांस्यपदक जिंकून भारताला पॅरिस ऑलिम्पिकमधील पहिलं पदक मिळवून दिलं होतं. याआधी कोणत्याही भारतीय खेळाडूला एका ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकता आलेली नाहीत. यासोबतच सरबज्योत सिंग आता ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारा सहावा भारतीय नेमबाज ठरला आहे.

हे देखील वाचा : हावडा-मुंबई एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरल्याने भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, २० हून अधिक जखमी

भारताच्या पॅरिस ऑलिम्पिकच्या कामगिरीवर नजर टाकली तर अनेक भारताचे खेळाडू अजूनही पदकाच्या शर्यतीत टिकून आहेत. यामध्ये भारताच्या बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन, एचएस प्रणॉय, ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधू आणि भारताची स्टार जोडी सात्विकसाईराज आणि चिराग शेट्टी हे अजूनही स्पर्धेमध्ये टिकून आहेत. त्याचबरोबर आज भारताचे आर्चर पदकांसाठी लढताना दिसणार आहेत. भारताचा धीरज बोम्मदेवरा, अंकिता भकत आणि भजन कौर हे पदकाच्या शर्यतीत लढणार आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या