Friday, October 18, 2024
Homeक्रीडामराठमोळ्या सचिन खिलारीचा पॅरालिम्पिक्समध्ये दबदबा; रौप्य पदकाला घातली गवसणी

मराठमोळ्या सचिन खिलारीचा पॅरालिम्पिक्समध्ये दबदबा; रौप्य पदकाला घातली गवसणी

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारतीय खेळाडूंचा अ‍ॅथलेटीक्समध्ये दबदबा सुरुच आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेतील F46 कॅटेगरीतील गोळाफेक प्रकारात मराठमोळ्या सचिन सरजेराव खिलारीने १६.३२ मीटर गोळा फेकत रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. त्‍याच्‍या या कामगिरीमुळे भारताने ४० वर्षांनंतर पॅरालिम्पिकमध्‍ये गोळाफेक क्रीडा प्रकारात पदक जिंकले आहे. यापूर्वी १९८४ मध्ये भारताने या क्रीडा प्रकारात पदक जिंकले होते. पॅरिस येथील पॅरालिम्पिक स्पर्धेतील भारताचे हे २१ वे पदक आहे.

सचिन खिलारीने आज १६.३२ मीटर्सच्या विक्रमी थ्रोसह दुसरे स्थान पटकावले. सचिनचे सुवर्णपदक अवघ्या ०.०६ मीटरने हुकले. कॅनडाच्या ग्रेग स्टीवर्टने १६.३८ मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सुवर्णपदक तर कांस्यपदक क्रोएशियाच्या लुका बाकोविच याने मिळवले. या स्पर्धेत भारताचा मोहम्मद यासर आठव्या तर रोहित कुमार नवव्या स्थानी राहिला.

- Advertisement -

गोळाफेक प्रकारातील फायनलमध्ये सचिनने पहिल्या प्रयत्नात १४.७२ मीटर लांब थ्रो केला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात १६.३२ मीटर थ्रो केला. हा त्याचा फायनलमधील सर्वोत्तम थ्रो ठरला. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्याने १६.१५ मीटर, चौथ्या प्रयत्नात त्याने १६.३१ मीटर, पाचव्या प्रयत्नात १६.०३ आणि सहाव्या प्रयत्नात त्याने १६.०३ मीटर लांब थ्रो केला. यासह १६.३२ मीटर लांब थ्रो सह त्याने रौप्य पदकावर आपले नाव कोरले.

अ‍ॅथलेटीक्समध्ये भारताने सर्वाधिक ११ पदकांची कमाई केली आहे. सचिनबद्दल बोलायचे झाले, तर त्याने २०२३ वर्ल्ड पॅरा अ‍ॅथलेटीक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या F46 गोळाफेक प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती. या स्पर्धेतील फायनलमध्ये त्याने १६.२१ मीटर लांब थ्रो करत सुवर्ण पदकावर नाव कोरले होते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या