नवी दिल्ली | प्रतिनिधी New Delhi
लोकसभेत शुक्रवारी जोरदार गोंधळ झाला. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकुर (Anurag Thakur) यांनी सोनिया गांधी व गांधी परिवाराचे नाव घेतल्यामुळे काँग्रेसच्या खासदारांनी प्रचंड गदारोळ केला.
Parliament Monsoon Session: लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. शुक्रवारी अर्थविधेयकावर चर्चा करताना सोनिया गांधी (Sonia Gandhi) व गांधी परिवार (Gandhi Family) चे नाव अर्थराज्य मंत्री अनुराग ठाकुर (Anurag Thakur)यांनी घेतला.
अनुराग ठाकुर म्हणाले प्रत्येक न्यायालयाने पीएम केयर्स फंड (PM Cares Fund) योग्य असल्याचा निर्णय दिला आहे. त्यात लहान, लहान मुलांनी देणगी दिली. परंतु नेहरूजी यांनी फंड बनवल होता. त्याचे रजिस्ट्रेशन केले नाही.
तुम्ही केवळ गांधी परिवारसाठी ट्रस्ट तयार केला. त्याचे अध्यक्षा सोनिया गांधी यांना केले. या प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे.
ठाकूर यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस खासदारांनी जोरदार गोंधळ केला. यावेळी काँग्रेस नेता अधीर रंजन चौधरी यांनी असंसदीय भाषेत ठाकूर यांच्यांवर टीका केली. गोंधळात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेचे कामकाज तहकूब केले.