Wednesday, July 24, 2024
Homeदेश विदेशतृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन राज्यसभेतून निलंबित

तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन राज्यसभेतून निलंबित

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

राज्यसभेत आज अध्यक्ष जगदीप धनखड (Rajyasabha Chairman) आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन (Derek O’Brien Suspended) यांच्यात जोरदार वादावादी झाली. यामुळे राज्यसभेचे खासदार डेरेक ओब्रायन यांना संसदेच्या उर्वरीत अधिवेशन कालावधीसाठी निलंबीत करण्यात आले. सभागृहातील बेशिस्त वर्तनामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

सततच्या सभागृहाच्या कामकाजात अडथळा निर्माण करणे, सभापतींचा अवमान करणे, आणि सभागृहात सतत गोंधळ निर्माण केल्याचे कारण देत राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांनी ओब्रायन यांच्या निलंबनाचा प्रस्ताव सभागृह नेते पियुष गोयल यांनी मांडला. त्यानंतर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dankhad) यांनी ओब्रायन यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.

सभागृहात नेमके काय घडले

आज राज्यसभेत सभापती जगदीप धनखड आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. डेरेक खुर्चीत बसून ओरडायला लागले. यानंतर अध्यक्षांनी त्यांना निलंबित केले. वास्तविक, वादाची सुरुवात पॉइंट ऑफ ऑर्डरवरून झाली. डेरेकना धनखड यांनी विचारले की, तुमचा पॉइंट ऑफ ऑर्डर काय आहे? डेरेक यांचा आवाज भलताच मोठा झाला.

डेरेक ओब्रायन यांनी मणिपूर मुद्यावर गंभीर चर्चेची मागणी लावून धरली. तुमच्या जागेवर बसा, अशी सूचना त्यांनी केली. तरी ते बोलत राहिले. त्यानंतर सभापती उठले आणि डेरेक ओब्रायन यांना मी सभागृह सोडण्याचे आदेश देत आहे. त्यांना उर्वरित हंगामासाठी निलंबित करण्यात आले आहे, असे धनखड म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या