दिल्ली | Delhi
संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली आहे. यावेळी लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांनी एकत्र येत फोटोसेशन केल्याचं पाहायला मिळालं.
यादरम्यान गुजरातमधील भाजप खासदार नरहरी अमीन अचानक बेशुद्ध पडले. मात्र, काही वेळातच त्यांची प्रकृती सुधारली आणि ते पुन्हा फोटो सेशनमध्ये सहभागी झाले. या घटनेनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहाही तात्काळ जागेवरून उठले आणि खासदार नरहरी अमीन यांच्याकडे पोहोचले. नरहरी अमीन यांना खासदारांनी पाणी दिले. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली.
फोटो सेशननंतर दोन्ही सभागृहातील खासदार सेंट्रल हॉलमध्ये जमले होते. त्यानंतर सर्व खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत संसदेच्या नवीन इमारतीत दाखल होतील. गणेश चतुर्थीच्या विशेष मुहूर्तावर आज, १९ सप्टेंबरपासून नवीन संसद भवनात कामकाज सुरू होणार आहे. काल जुन्या संसदेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी खूपच भावूक झाले होते.