Sunday, June 23, 2024
Homeनगरमांडओहोळ धरणामध्ये बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

मांडओहोळ धरणामध्ये बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

पारनेर | तालुका प्रतिनिधी

- Advertisement -

नगर (Ahmednagar) येथील १६ वर्षीय शाळकरी मुलाचा मांडओहोळ धरणामध्ये (Mandohol dam) पोहत असताना बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

कर्जुले हर्या (ता. पारनेर) येथे गुरुवार, दि. ५ मे रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमाराम नगरहून कुटुंबातील २० जण फिरण्यासाठी आले होते. धरणातील पाण्यात पोहण्यासाठी अनेक जण उतरले होते. मात्र, यातील मृत तरुण मोहसीन मुकीनमुद्दीन काझी (वय १६) याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला.

राणादा अन् पाठकबाईचा एकमेकांत जीव रंगला; पहा साखरपुड्याचे खास फोटो

नातेवाईकांनी आरडाओरडा केल्यावर स्थानिक लोकांनी बचावाचा प्रयत्न केला. मोहसीनला पाण्याबाहेर काढून टाकळी ढोकेश्वर येथे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉ. संदीप देठे यांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेत मोहसीनचे दोन साथीदार बालंबाल बचावले. याबाबत म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे व पोलिस कॉन्स्टेबल गवळी यांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने मोहसीनला पाण्याबाहेर काढले. सायंकाळी ५ वाजता ही घटना घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, हेड कॉन्स्टेबल प्रीतम मोढवे, कर्मचारी जगदीश बुधवंत, श्रीनाथ गवळी आदी करत आहे.

अजब लग्नाची गजब गोष्ट! चक्क वयाच्या ६६ व्या वर्षी भारताचे माजी क्रिकेटपटू चढले बोहल्यावर

टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयात तात्काळ उपचारासाठी डॉक्टरच नाही

टाकळी ढोकेश्वर परिसरामध्ये अनेक दूर्घटना घडत असतात. टाकळी ढोकेश्वर ग्रामीण रुग्णालयात एक नर्स व शिपाई वगळता एकही कर्मचारी वा डॉक्टर उपस्थित नसतात. या घटनेवेळी खासगी डॉ. संदीप देठे यांना मृत घोषित करावे लागले. याबाबत कारवाई करण्याची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या