पारनेर | तालुका प्रतिनिधी
पारनेर म्हस्णे फाटा रोडवर वडनेर हवेली जवळ मोटार सायकल स्वारानी पायी चाललेल्या निवृत्त शिक्षकास जोराची धडक दिल्याने शिक्षकाचे जागीच निधन झाले.
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेले माहिती अशी की, वडनेर हवेली येथील निवृत्त शिक्षक हरिभाऊ बढे (वय अंदाजे 60-65 वर्षे) हे रविवार दि 23 एप्रिल 2023 रोजी सांयकाळी पारनेर म्हस्णे फाटा रोडनी वडनेर हवेली गावाच्या शिवारात पायी चालले असताना पारनेरकडून म्हस्णे फाटा औद्योगिक वसाहतीकडे जात असलेले परप्रांतीय कामगारानी त्यांच्या जवळी मोटार सायकल क्रमांक MH 16 CH 0784 या गाडीची बढे यास पाठीमागुन जोराची धडक दिली.
MPSC संयुक्त परीक्षेचे ९० हजारांपेक्षा जास्त हॉल तिकीट Telegram वर लीक… आयोगाचे काय स्पष्टीकरण ?
धडक खुप जोराची असल्याने बढे लांब जाऊन पडले व जबर जखमी होऊन त्याचे जागेवरच निधन झाले. मोटार सायकल चालकही लांब जाऊन डले. यात मोटार सायकल वरील दोघापैकी एक जखमी झाला असुन त्यास रुग्णालयात नेले असुन एक मात्र तेथुन पसार झाला आहे. अशी प्राथमिक माहिती हाती आली आहे .
“दादा ज्याचं जळतं…”, सुषमा अंधारेंचे राज ठाकरेंना खरमरीत पत्र; ६ प्रश्न विचारून केली कोंडी
घटनेची माहिती कळताच सुपा पोलिस स्टेशनच्या पोलिस निरिक्षक श्रीमती ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली सुपा पोलिस व रुग्णवाहिका चालक सादिकभाई तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुपा पोलिसांनी घटनेची सविस्तर माहिती घेतली असुन या घटनेतील मोटार सायकल स्वराचा शोध घेत आहेत.
हरणाला वाचवण्याच्या नादात पोलिसांच्या गाडीचा भीषण अपघात, पोलिस कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू