Friday, April 25, 2025
Homeनगरपारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल

पारनेर साखर कारखाना विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल

क्रांती शुगरच्या अध्यक्षांसह 9 संचालक, राज्य शिखर बँकेचे दोन वरिष्ठ अधिकारी अडचणीत

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखाना विक्रीप्रकरणात गैरव्यवहार करणार्‍या क्रांती शुगर या खासगी साखर कारखान्याच्या अध्यक्षांसह 9 संचालक व महाराष्ट्र राज्य सहकारी या शिखर बँकेचे दोन वरिष्ठ अधिकारी यांच्याविरुद्ध पारनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारनेर सहकारी साखर कारखाना बेकायदा विक्रीप्रकरणी दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश पारनेर न्यायालयाने दिले होते. न्यायालयाच्या या आदेशानंतर पारनेर पोलिस ठाण्यात क्रांती शुगर अ‍ॅण्ड पॉवर प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या खासगी साखर कारखान्याचे अध्यक्ष ज्ञानेश नवले, पांडुरंग नवले, दत्तात्रय नवले, भिकू नवले, जालिंदर नवले, गुलाब नवले, शिवराज नवले, श्रीधर नवले व निवृत्ती नवले या 9 संचालकांसह महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे तत्कालीन जनरल मॅनेजर अनंत भुईभार व वरिष्ठ अधिकारी अनिल चव्हाण या दोघांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

या प्रकरणात आरोपींनी बनावट गहाणखताद्वारे पारनेर कारखान्यावर कर्जाचा फुगवटा निर्माण करणे, बेकायदा साखर तारण कर्ज देणे, विक्री प्रक्रियेत एकाच निविदाधारकाला फायदा मिळवून देण्यासाठी बेकायदा मदत करणे, शासनाचे मुद्रांक शुल्क बुडवणे, खरेदी खताला बनावट कागदपत्रे जोडणे, मालमत्तेवरील शासनाचा बोजा लपविणे, विक्री व्यवहारात काळा पैसा पांढरा करणे, मालमत्ता विकून उरलेली रक्कम कर्जदाराला परत न करणे, बँकेकडे तारण नसलेल्या दहा हेक्टर जमीनीचा क्रांती शुगर कंपनीला बेकायदा ताबा देणे आदी मुद्द्यांसह कारखाना बचाव समितीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ तसेच पारनेर येथील प्रथम न्यायालयाकडे धाव घेतली होती.

आरोपींच्या अटकेची मागणी
पारनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर कारखाना बचाव समितीने आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. याबाबतचे निवेदन पारनेरचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर व जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना देण्यात आले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...