Monday, June 24, 2024
Homeनगरपारनेर तालुक्यात गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलीसांचा छापा

पारनेर तालुक्यात गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर पोलीसांचा छापा

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

- Advertisement -

तालुक्यातील पठारवाडी शिवारात पवारचारी जवळ हातभट्टी दारू अड्ड्यावर (Hand Furnace Alcohol) पारनेर पोलीसांनी छापा (Parner Police Raid) टाकून सुमारे 5 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. तर दोन संशयितांना अटक (Arrested) करण्यात आली आहे.

धोंडीबा महादु जाधव (वय 31 रा. निघोज कुंड, सुलाखेवाडी ता. पारनेर) व अदिनाथ पठारे (वय 27 रा. पठारवाडी ता. पारनेर) अशी या प्रकरणी अटक (Arrested) करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.

श्रीरामपूर, राहुरी, संगमनेर, पारनेर, श्रीगोंद्यात दुधाची तपासणी

पारनेरचे पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांना पठारवाडी शिवारातील पवारवाडी चारी जवळ हातभट्टीची दारु (Hand Furnace Alcohol) निर्मिती करत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. त्यांनी स्वतः तत्काळ पथक तयार करून दोन खाजगी वाहनाने पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले, पोलीस कर्मचरी गहिनीनाथ यादव, मयूर तोरडमल, विवेक दळवी, सागर धुमाळ, सारंग वाघ यांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा (Police Raid) टाकला.

खा. विखेंकडून एमआयडीसी भूसंपादनाचा आढावा

यावेळी गावठी हातभट्टीची दारु (Hand Furnace Alcohol) तयार करण्याचे कच्चे रसायण, गावठी हातभट्टी तयार दारू व साधने असा 5 लाख 10 हजार रूपयांचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला. यातील कच्चे रसायन जागेवर नष्ट करण्यात आले. संशयित दोघांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा प्रमाणे व इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

निळवंडे डाव्या कालव्यातून लवकरच पाणी सोडणार – ना. विखे पाटील

- Advertisment -

ताज्या बातम्या