Monday, June 24, 2024
Homeनगरपारनेर तालुक्यात ग्रामपंचायतसाठी एकही अर्ज नाही

पारनेर तालुक्यात ग्रामपंचायतसाठी एकही अर्ज नाही

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

- Advertisement -

पारनेर तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुका 5 नोव्हेंबर रोजी होत असून त्यासाठी सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर 2023 पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. परंतु दोन दिवसांत एकही अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती निवडणूक अधिकार्‍यांनी दिली.

पारनेर तालुक्यातील कान्हुर पठार, काकणेवाडी, जामगाव, विरोली, वाडेगव्हाण, यादववाडी, मावळेवाडी या सात ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक 5 नोव्हेंबर रोजी होत असून याचवेळी तालुक्यातील कासारे, शहाजापूर, पाडळी आळे, पाडळी दर्या, भांडगाव, वारणवाडी या गावातील काही रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक होत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 20 ऑक्टोबरपर्यंत आहे.

23 ऑक्टोबरला छाननी होणार असून 25 ऑक्टोबरला अर्ज मागे घेता येतील. त्याच दिवशी चिन्ह वाटप केले जाणार आहेत. 5 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दोन दिवसांत एकही अर्ज दाखल झाला नसल्याने राहिलेल्या चार दिवसांत अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होऊ शकते असे निवडणूक अधिकार्‍यांनी सागितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या