Tuesday, May 21, 2024
Homeनगरपारनेर तालुक्यातील या गावात ऊसाच्या शेतात गांजाची लागवड

पारनेर तालुक्यातील या गावात ऊसाच्या शेतात गांजाची लागवड

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

तालुक्यातील गुणोरे (Gunore) एका शेतकर्‍याने (Farmer) ऊसाच्या शेतात गांजाची लागवड (Cannabis Cultivation) केल्याची माहिती मिळाल्यानंतर पारनेर पोलीसांच्या (Parner Police) पथकाने बुधवारी (दि.12) दुपारी छापा (Raid) टाकला. या शेतामधून सुमारे 12 लाख रूपये किंमतीचा 250 किलो गांजा पोलीसांनी हस्तगत (Cannabis Seized) केला असून दोन शेतकरी भावांवर गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

- Advertisement -

नितील उर्फ गोट्या रामदास गोपाळे व बाळू रामदास गोपाळे (रा. कारखिले मळा, गुणोरे, ता. पारनेर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून यातील बाळु गोपाळे यास पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

राहाता बाजार समितीतील वाचा सोयाबीनचे भाव

गुणोरे (Gunore) येथील गाडीलगांव रस्त्यावरील मळयात गोपाळे यांच्या ऊसाच्या शेतात (Sugarcane Farm ) गांजाची शेती करण्यात येत असल्याची माहीती गुप्त बातमीदारामार्फत पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली होती. यानंतर गायकवाड यांनी पोलीसांचे पथक तयार करून गोपाळे यांच्या मळयात छापा (Raid) टाकला. ऊसाच्या शेतात पाहणी करण्यात आली असता तेथे सरीमध्ये गांजाच्या झाडांचे संवर्धन करण्यात येत असल्याचे आढळून आले. पोलीसांनी गांजाची संपूर्ण झाडे तोडून ती जप्त (Cannabis Seized) केली. याप्रकरणी बाळू रामदास गोपाळे यास ताब्यात घेण्यात आले असून उशिरापर्यंत पंचनामा तसेच फिर्याद दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.

मिळालेल्या माहीतीनुसार गाडीलगांव रस्त्यावर गोपाळे यांची सुमारे वीस एकर शेती आहे. त्या शेतीमधील उसाच्या शेतात गांजाची शेती (Cannabis Farm) करण्यात येत होती. या शेतीच्या आजूबाजूने इतर कोणीही जात नसल्याने गोपाळे यांचा हा उद्योग सहीसलामत सुरू होता. मात्र गुप्त बातमीदाराने गोपाळेंच्या या उद्योगाची पोलखोल केल्यानंतर पोलीसांनी बुधवारी दुपारी  दोन वाजण्याच्या सुमारास पोलीसांच्या फौजफाटयासह जात कारवाई केली.

या कारवाईत नायब तहसिलदार गणेश आधारी, पोलीस निरीक्षक संभाजीराव गायकवाड यांच्या मार्गर्शनाखाली निघोज दुरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी उपनिरीक्षक हनुमंत उगले, गणेश डहाळे, मच्छिंद्र धुमाळ, मयुर तोरडमल व इतर कर्मचार्‍यांनी  सहभाग घेतला.

श्रीनगरला अडकलेले श्रीरामपूर, बेलापूर, कोल्हार आणि लोणीचे भाविक सुखरूप

वर्षभरापूर्वी कारवाई बारगळली ?

वर्षभरापूर्वी पारनेर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी गोपाळे याच्या शेतामध्ये आले होते. बराच वेळ थांबल्यानंतर ते निघून गेले. त्यामुळे ही कारवाई गोपाळे याने दडपली असावी अशी कुजबूज गुणोरे परीसरात सुरू होती.

तरुण ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची आत्महत्या

- Advertisment -

ताज्या बातम्या