Saturday, May 4, 2024
Homeनगरपावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पारनेरची आरोग्य यंत्रणा सज्ज!

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पारनेरची आरोग्य यंत्रणा सज्ज!

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पावसाळा सुरू झाला असून नविन पाण्याबरोबर साथजन्य आजारांचा धोका वाढला आहे. पावसाळ्याच्या साथीसोबत किटकजन्य व जलजन्य आजारांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. यासाठी आतापासून पारनेर पंचायत समितीची आरोग्य सेवा ग्रामीण भागासाठी सज्ज झाली आहे.

- Advertisement -

पावसाळ्यात नवीन पाण्याबरोबर विविध प्रकारच्या साथजन्य आजारांची शक्यता असून यात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यासारख्या किटकजन्य आजारांचा समावेश असून दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, विषमज्वर, कॉलरा, कावीळ या जलजन्य आजार होण्याची शक्यता आहे. पावासाळ्यात आरोग्यविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत गटविकास अधिकारी किशोर माने व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांच्याकडे विचारणा केली असता, पावसाळा सुरू झाल्यानंतर नवीन पाण्याची तपासणी केली जात आहे. साठलेल्या खड्ड्यात डासाची उत्पती होऊ नये, म्हणून ग्रामपंचायतींना निरुपयोगी खड्डे बुजवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

काही ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात येत आहेत. पावसाळ्यात सर्दी खोकल्याचे प्रमाण जास्त असते. त्या अनुषंगाने आरोग्य कर्मचार्‍यांमार्फत त्याचे सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांत जनजागृती केली जात आहे. त्यांना आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्यास सांगण्यात येत आहे. आरोग्याची काळजी घ्यावी, आदी सूचना नागरिकांना देण्यात येत आहेत. तालुक्यातील सर्वच आरोग्य केंद्रांनी मुबलक औषध साठा उपलब्ध करून ठेवला असून कर्मचार्‍यांना सज्ज राहण्यास सांगितले आहे.

तसेच आरोग्य अधिकारी व डॉक्टर यांनी जास्तीतजास्त वेळ मुख्यालयात थांबावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य कर्मचार्‍यांनी सतर्क रहण्याचे आदेश दिले असल्याचे माने आणि डॉ. लाळगे यांनी सांगितले. पारनेर तालुका क्षेत्रफळाने मोठा असून तालुक्यातील अनेक भाग दुर्गम आहे. त्यामुळे ऐनवेळी आरोग्य सेवा पोहचवण्यास अडचण नको म्हणून आरोग्य विभागाने अगोदरच औषधसाठा पोहच केला असून सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या