Friday, May 3, 2024
Homeनगरपारनेर तालुक्यांमध्ये काही भागात ढगफुटी

पारनेर तालुक्यांमध्ये काही भागात ढगफुटी

सुपा |वार्ताहार|Supa

पारनेर तालुक्यांमध्ये पारनेर शहरासह हंगा, शहाजापुर, वडनेर, लोणी हवेली, व परिसरामध्ये सोमवारी सांयकाळी मुसळधार पाऊस झाल्यामुळे बराच वेळ जनजीवन विस्कळीत झाले होते.

- Advertisement -

तर काही भागांमध्ये ढगफुटी सारखा प्रकार झाला. त्यामुळे परिसरातील ओढे नाला नदी यांना मोठ्या स्वरूपामध्ये पूर आला होता. तसेच शेतीचे बर्याच ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे.

तालुक्यामध्ये अनेक दिवसापासून पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीला पाण्यासाठी पावसाची मोठी गरज असते, मात्र अनेक दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतकरी हैराण झाला आहे. त्यातच आज दुपारी शहरासह परिसरामध्ये मोठ्या स्वरूपात पाऊस बरसला दोन ते तीन तास पाऊस मुसळधार पडत असल्यामुळे सर्व ओढे नाले ओसंडून वाहत होते.

अनेक भागांमध्ये रस्त्यांच्या पुला वरती पाणी आल्याने रस्त्याची वाहतूक ठप्प झाली होती. पारनेर शहरामध्ये जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे हंगा तलावाला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी प्रवाह झाल्याने तलाव वाटे मोठ्या प्रमाणात विसर्ग झाला. त्यामुळे तलावा खालील नदीला देखील मोठा पूर आला. त्यामध्ये वाघुंडे येथील दत्त मंदिर पाण्याखाली आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या