पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner
पारनेर तालुक्यातील कडूस गावामध्ये गुरुवारी उषा पांडुरंग शिंदे (वय 42) या मानसिक रुग्ण असणार्या महिलेचा खून झाला आहे. याप्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून खून झालेली महिला शिंदेचे हिचे शव पीएमसाठी नगरला पाठवण्यात आले असल्याची माहिती सुपा पोलिसांच्यावतीने देण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की , पारनेर तालुक्यातील उषा शिंदे या मनोरुग्ण महिलेचा मृतदेह कडूस गावाच्या परिसरात आढळून आला. मयत शिंदे या महिलेच्या डोक्यात दगडाने वार करून तिचा खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांना असून याप्रकरणी नामदेव करंजुले यांच्या खबर वरून पोलिसात अज्ञात व्यक्ती विरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिलेच्या मृतदेहाचे पीएम केल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येणार आहे. पुढील तपास सुपा पोलीस स्टेशनच्या निरीक्षक ज्योती गडकरी करत आहेत.




