Tuesday, April 28, 2026
Homeनगरकीर्तनकाराचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गरम पक्कडचे चटके अन् अमानुष मारहाण

कीर्तनकाराचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गरम पक्कडचे चटके अन् अमानुष मारहाण

पारनेर (तालुका प्रतिनिधी)

अध्यात्म आणि संस्काराचे धडे देणाऱ्या वारकरी संप्रदायाला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथे उघडकीस आली आहे. श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ (महाराज) याने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर मागील पाच वर्षांपासून धाक दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलीला गरम लोखंडी पक्कडीने चटके देऊन अमानुष मारहाण केल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.

- Advertisement -

या प्रकरणामुळे संतापाची लाट उसळली असून पीडितेच्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. १४) श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आणि कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ (महाराज) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता आठवीत असल्यापासून हा प्रकार सुरू होता. आरोपी यशवंत थोरात हा पीडितेच्या शेजारीच राहत असल्याने दोन्ही कुटुंबांचे घरोब्याचे संबंध होते. पीडितेचा भाऊ आरोपीच्याच वारकरी शिक्षण संस्थेत सचिव म्हणून कार्यरत आहे. याचाच फायदा घेऊन आरोपीने २०११ पासून पीडितेवर वाईट नजर ठेवली होती. मुलगी घरी एकटी असताना किंवा आरोपीच्या घरी कोणी नसताना त्याने वारंवार तिच्यावर बळजबरीने शरीरसंबंध प्रस्थापित केले.

पीडितेने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. मी दोन हाफ मर्डर केलेले आहेत, जर कोणाला काही सांगितले तर तुझ्या आई-वडिलांना आणि भावाला मारून टाकीन, अशी भीती तो घालत होता. कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी पीडितेने हा छळ मुकाट्याने सहन केला.

घटनेचा थरार १० मार्च २०२६ रोजी शिगेला पोहोचला. आरोपीने पीडितेला फोन करून त्याच्या घरी बोलावले. तिने येण्यास नकार दिला असता, त्याने कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली. भीतीपोटी पीडिता त्याच्या घरी गेली असता, आरोपीने तिला कॉम्प्युटर रूममध्ये नेऊन बांबूने व चापटीने बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, नराधम आरोपीने स्वयंपाकाची लोखंडी पक्कड गॅसवर गरम करून पीडितेच्या अंगाला चटके दिले. या अमानुष कृत्यानंतरही त्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. मारहाण आणि चटक्यांमुळे पीडितेला चालणेही कठीण झाले होते. १४ मार्च रोजी तिचा भाऊ घरी आला असता, तिला गंभीर अवस्थेत पाहून त्याने विश्वासात घेतले. मावस भावांच्या उपस्थितीत पीडितेने आपल्यावर झालेला पाच वर्षांचा अन्याय कथन केला. त्यानंतर पीडितेच्या भावाने पारनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली.

पारनेर पोलिसांनी याप्रकरणी यशवंत एकनाथ थोरात विरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे. अशा भोंदू महाराजावर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

पारनेर पोलिसांनी आरोपी यशवंत महाराज थोरात याला रविवारी (दि.१५) पहाटे चार वाजता ढवळपुरी येथून राहत्या घरातून अटक केली. न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला २० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याच्या आदेश दिले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत मारग करत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Suicide News : सप्तश्रृंगी गडाच्या शीतकड्यावरून उडी घेऊन तरुणाची आत्महत्या

0
सप्तश्रृंग गड| प्रतिनिधी | Saptashrung Gadh श्रीक्षेत्र सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी (Saptashrungi Gadh Darshan) आलेल्या ब्राह्मणवेल ता. साक्री येथील तरुणाने (Youth) शीतकड्यावरुन खोल दरीत उडी घेऊन...