Wednesday, May 29, 2024
Homeनगरपारनेर : मुंगशीत तरुणावर बिबट्याचा हल्ला

पारनेर : मुंगशीत तरुणावर बिबट्याचा हल्ला

सुपा |वार्ताहार| Supa

पारनेर तालुक्यातील मुंगशी या गावी बिबट्याने चांगलीच दहशत पसरवली आहे.

- Advertisement -

शनिवारी पहाटे प्रविण मारुती करपे हे आपल्या घरापुढील पडवीत झोपलेले आसताना बिबट्याने पहाटे 3.00 च्या सुमारास हाल्ला केला. करपे झोपेत आसल्याने बेसावध होते त्यामुळे ते या हल्यात गंभीर जखमी झाले. आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथुन धुम ठोकली. करपे यांच्यावर पारनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

याबाबत मुंगशी ग्रामस्थांनी वन अधिकार्‍यांना लेखी पञ देऊन सविस्तर माहिती दिली. वन अधिकार्‍यांनी घटना स्थळी भेट दिली व वरिष्ठाशी बोलून तात्काळ पिंजरा लावण्याची व्यवस्था करतो असे म्हणाले. यावेळी ग्रामस्थांनी सांगितले कि गेल्या पंधरा दिवसापासुन बिबट्या मुंगशी, हंगा शिवारात वावरत आहे.

त्याने आतापर्यंत दोन तीन कुञ्याचीही शिकार केली आहेत. आता तो बिबट्या माणसावर हाल्ला करु लागल्याने ग्रामस्थ चांगलेच भयभीत झाले आहेत. शेतकरी, महीला एकटे शेतावर जाणे धोक्याचे झाले आहे. तेव्हा वन अधिकार्‍यांनी लवकरात लवकर या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मुंगशीचे ग्रामस्थ मागणी करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या