Friday, April 25, 2025
Homeनगरपारनेर नगराध्यक्षांचे दुसर्‍यांदा राजीनामा नाट्य

पारनेर नगराध्यक्षांचे दुसर्‍यांदा राजीनामा नाट्य

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष विजय औटी यांनी 22 जुनला आपला नगराध्यक्ष पदाचा राजीनामा आमदार निलेश लंके यांच्या कडे देणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली आहे. ते दुसर्‍यांदा राजीनामा देत आहेत. यापुर्वी पाणी पुरवठ्यावरून नगरपंचायतीच्या एका कर्मचार्‍यास मारहाण प्रकरणानंतर व काही गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता. मात्र तो अद्याप मान्य झालाच नाही. आता पुन्हा त्यांनी राजीनाम्याची घोषणा केल्याने सर्वांच्या भुवया उंचवल्या आहेत.

- Advertisement -

सुमारे सव्वा वर्षापुर्वी पारनेर नगरपंचायतची पंचवार्षिक निवडणूक झाली होती. यावेळी राष्ट्रवादी पक्षाला स्पष्ट बहुमत नसताना आमदार निलेश लंके यांनी राजकीय डावपेच टाकत आपक्ष व विरोधी गटातील सदस्यांना बरोबर घेत नगरपंचायतची सत्ता ताब्यात घेतली होती. यावेळी आमदार लंके यांनी सर्वाधिक निष्टावंत म्हणून विजय औटी यांच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ घातली होती. सर्वांना समान संधी म्हणून नगराध्यक्ष विजय औटी यांनी आपला सव्वा वर्षाचा कार्यकाल पुर्ण केला आसल्याने व आमदार लंकेना दिलेल्या शब्दाप्रमाणे औटी लवकरच अध्यक्ष पदाचा राजनामा देणार आसल्याचे औटी यांनी शनिवारी दुपारी पारनेर येथे पत्रकार परिषद घेऊन सांगितले .

औटी म्हणाले, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार नीलेश लंके यांनी पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी संधी दिली. दुसरीकडे या कार्यकाळात माझ्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल झाले. तरीही पारनेरच्या पाणी प्रश्नासह इतर सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. माझ्या सव्वा वर्षाचा कार्यकाळात पाणीप्रश्न गंभीर विषय हातात घेतला होता. पारनेरच्या पाणी प्रश्नावरून नगरपंचायतीच्या एका अकार्यक्षम अधिकार्‍याने माझ्या सरकारी कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला हेता.

परंतु ही प्रक्रिया चालू असताना दुसरा गुन्हा दाखल झाला. परंतु न्यायालयाने या एका प्रकरणात क्लिनचीट दिली आहे. मनकर्णिका नदी काशीनंतर पारनेरला असून तीर्थक्षेत्राबरोबर पर्यटन विकास करण्याचा माणसं होता, तो अधुरा राहिला असल्याची खंत नगराध्यक्ष विजय औटी यांनी व्यक्त केली. यावेळी त्याचे बंधू माजी नगरसेवक नंदू औटी हे ही उपस्थित होते.

नगराध्यक्षपदासाठी कावरे, अडसूळ स्पर्धेत

विजय औटी यांच्या राजीनाम्यानंतर नगराध्यक्षपदासाठी डॉ. विद्या बाळासाहेब कावरे व नगरसेवक नितीन अडसूळ हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. या नगराध्यक्ष निवडीत कावरे की अडसूळ यापैकी आ. लंके कोणाची निवड करतात याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...