Sunday, October 13, 2024
Homeनगरचर्चा तर होणारच! अजित दादांच्या बॅनरवर झळकला शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचा...

चर्चा तर होणारच! अजित दादांच्या बॅनरवर झळकला शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचा फोटो

पारनेर | तालुका प्रतिनिधी

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आज पारनेर (Parner) दौऱ्यावर आहेत. यावेळी अजित पवारांचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांच्यावर जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच यावेळी अजित पवारांनी धडाकेबाज भाषण केलं.

- Advertisement -

याचदरम्यान सभेच्या ठिकाणी जो बॅनर लावण्यात आलेला आहे. त्यावरुन सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. त्या बॅनरवर शरद पवार (Sharad Pawar), सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि अजित पवार यांचा एकत्रित फोटो लावण्यात आला आहे. सध्या पारनेरमधील हा बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे. माझा फोटो परवानगी शिवाय वापरणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा शरद पवारांनी संभाजीनगर, बीड (Beed) दौऱ्यावर असतांना दिला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या