Saturday, July 27, 2024
Homeनगरपारनेर तालुक्यात स्कुलबसकडून वाहतूक नियम पायदळी

पारनेर तालुक्यात स्कुलबसकडून वाहतूक नियम पायदळी

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पारनेर शहर तसेच तालुक्यातील खासगी संस्थांच्या स्कुलबस सर्रास आरटीओच्या नियम पायदळी तुडवत असून बसमध्ये विद्यार्थी जनावरांप्रमाणे कोंबले जात आहेत.

- Advertisement -

बहुतांश मराठी माध्यम व इंग्रजी माध्यमातील खाजगी शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनीना घरापासून शाळेपर्यंत ने आण करण्यासाठीं या नामांकित संस्थांच्या स्कूलबस आहेत. या स्कूलबसमध्ये बसचालक वाहतूक नियमानुसार विद्यार्थी आसन क्षमता 42 असताना मात्र स्कूलबसमध्ये 70 ते 80 विद्यार्थि व विद्यार्थीनी दाटी वाटिने प्रवास करत असल्याने या चिमुकल्यांच्या जीवाशी या खाजगी संस्था खेळत असल्याचा प्रकार काल 15 ऑगस्ट या स्वातंत्रदिनाच्या दिवशीही दिसून आला. त्यामुळे या खाजगी संस्थांच्या स्कूलबसकडे आर टी ओ विभाग दुर्लक्ष करत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

पारनेर शहरात विविध शैक्षणीक संस्थाच्या बहुतांश इंग्रजी तसेच मराठी माध्यमाच्या शाळा आहेत. प्रत्येक शाळांच्या स्कूलबस व व्हॅन्स आहेत. स्कूल बसची विद्यार्थी व विद्यार्थिनी वाहतूक आसन क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची ने आण करत असल्याचे दिसून येत आहे. यात भरीस भर म्हणून चालकाच्या केबिन मध्येही दहा ते बारा विद्यार्थ्यांना उभे करण्यात येते. बस मधील मोकळ्या जागेतही विद्यार्थ्यांना उभे करण्यात आले होते. अशा भरगच्च भरलेल्या बस सर्व वेगाचे नियम तोडून धावत असतात.

अनेक विद्यार्थ्यांच्या मांडीवर विद्यार्थी बसल्याचे दिसत आहे. त्यामुळे या शैक्षणीक संस्थांच्या स्कूलबसवर आरटीओ विभाग दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे. या बस चालकांकडून वेग नियंत्रण असताना सुद्धा वेगात स्कूल बस चालक चालवत असतात. चालकांच्या या दुर्लक्षामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आसनावर व्यवस्थित बसण्याची व्यवस्था नसल्याने लहान चिमुकल्यांना त्रास होण्याची प्रकार घडत आहेत. या चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ करणार्‍या खाजगी शैक्षणिक संस्थांना वाहतूक विभागाने समज देण्याची आवश्यकता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या