Friday, May 24, 2024
HomeनगरAccident News : भीषण अपघात! भरधाव पिकअपची पाच वाहनांना धडक, दोघे गंभीर...

Accident News : भीषण अपघात! भरधाव पिकअपची पाच वाहनांना धडक, दोघे गंभीर जखमी

पारनेर | तालुका प्रतिनिधी

सुपा बस स्थानक चौकात एका पिकअपने (dumper accident) पाच वाहनांना जोराची धडक दिली आहे. या अपघातामध्ये दोघे गंभीर जखमी झाले आहे. तर तीन चार किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात सकाळी दहाच्या सुमाराम घडला आहे.

- Advertisement -

याबाबत अधिक माहिती अशी, आज सकाळच्या सुमारास पिकअप चालक सोहेल शेख (रा. छञपती संभाजीनगर) हा वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करत अत्यंत बेजाबदारपणे वाहन चालवत पुण्याहून छञपती संभाजीनगरच्या दिशेने येत होता. सोहेल हा भरधाव वेगाने वाहन चालवत होता. त्याचे पिकअप वाहन हे सुपा बस स्थानक परिसरात आले येताच त्याने प्रथम त्याने एका कारला जोराची धडक दिली. या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाल्याने पिकअप चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु धडक दिल्याने त्याच्या गाडीचा बँलस हालल्याने पुढे तो एका उभ्या असलेल्या रिक्षाला धडकला.

Crime News : शेतकऱ्याने केले नको ते धाडस, पोलीस पोहचले थेट शेताच्या बांधावर अन्….

यात रिक्षाचेही मोठे नुकसान होऊन आतील प्रवाशी व्यक्तीला जोरदार मार बसला. पुढे या पिकअपने उभ्या असलेल्या दोन मोटार सायकलस्वारांना जोराची धडक दिली. यात अनेक जण जखमी झाले आहेत. दोन दुचाकीस्वारांना धडक देत पिकअप चालकाने आणखी एका कारला जोराची धडक दिली व थांबली. दरम्यान या अपघातात पिकअप चालक सोहेल शेख याने निष्काळजीपणे वाहन चालवत दोन कार, एक रिक्षा व दोन मोटारसायकला जोराची धडक देऊन अनेक व्यक्तींना जखमी केले आहे. या अपघातामध्ये दोघे गंभीर जखमी झाले आहे. यातील एका जखमीला अहमदनगर येथील खाजगी रुग्णालयात हलवले असून एकावर सुपा येथील खाजगी रुग्णालयात उपचार केले जात आहे. पिकअप चालकाला नागरिकांनी सुपा पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

राज्यात दोन उपमुख्यमंत्री… मग गावातही दोन उपसरपंच करा; पठ्ठ्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी

- Advertisment -

ताज्या बातम्या